Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २६ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
पित्ताशय नलिकेतील खडे काढत रूग्णाला दिले जीवदान, धुळे जिल्ह्यातील जवाहर मेडिकल फाउंडेशन मध्ये तज्ञ डॉ.चा योगदाननाने अवघड शस्त्रक्रिया यशस्वी
पित्ताशय नलिकेतील खडे काढत रूग्णाला दिले जीवदान, धुळे जिल्ह्यातील जवाहर मेडिकल फाउंडेशन मध्ये तज्ञ डॉ.चा योगदाननाने अवघड शस्त्रक्रिया यशस्वी
धुळे शहरात राहणारे ६७ वर्षीय वसंत जाधव यांच्या पित्ताशय नलिकेत अडकलेले खडे अवघड शस्त्रक्रियेव्दारे काढत त्यांना जीवदान देण्याचे काम जवाहर मेडिकल फाउंडेशनमधील सर्जन डॉ.अक्षय कुलकर्णी, डॉ कैलाश गिंदोडिया यांनी केले आहे. सदर रूग्णांची प्रकृती आता ठिक असून त्याला जेवणही पचायला लागले आहे. दरम्यान पूर्णपणे मोफत ही शत्रक्रिया करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की धुळयातील अभय कॉलेजजवळ राहणारे वसंत जाधव वय ६७ यांनी मागील अनेक दिवसांपासून पोटदुखीचा त्रास सुरू होता. प्राथमिक तपासणीत त्यांचे पित्ताशय व यकृताला जोडणारी मुख्य नलिका यात खडे अडकून ऑबस्ट्रीक्टीव्ह जॉईंडीस अर्थात कावीळ झाल्याचे निदान करण्यात आले. याशिवाय त्यांना तीव्र दमा असल्याने भूल देणे हे आव्हानात्मक काम होते. अशा पिरिस्थितीत पित्ताशय काढून सदर नळीतील खडे काढण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यानुसार ८ मार्च रोजी सर्जन डॉ.अक्षय कुलकर्णी, डॉ.कैलाश गिंदोडिया, डॉ.सौरभ निकुंभ यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण केली. शत्रक्रियेनंतर पित्ताश्याची नळी आतड्यांना जोडण्यात आली. भूल देण्याचे आव्हानात्मक काम डॉ.मनोजकुमार कोल्हे व डॉ.मानसी पानट यांनी केले. या शस्त्रक्रियेसाठी डॉ.अली, डॉ.सिध्देश, डॉ.शिवम, डॉ.ओमकार, सिस्टर रेखा चौधरी व ब्रदर, विकास यांचे सहकार्य लाभले. आठ दिवसात सदर रूग्ण पूर्णपणे बरा होवून त्यांना आता जेवणही पचायला लागले आहे. दरम्यान ही कोलेडोकोडुओडुनोस्टोमी नामक अवघड शस्त्रक्रिया पूर्ण करून रूग्णास जीवनदान देण्याचे काम जवाहर मेडिकलच्या टिमने केले. या शस्त्रक्रियेसाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, डॉ.ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके, वैदयकीय अधिक्षक डॉ.मधुकर पवार आदींनी सहकार्य केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा