Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून किरीट सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण होत आहे. - ना. जयंत पाटील
अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून किरीट सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण होत आहे. - ना. जयंत पाटील
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांना जप्तीबद्दल आधी कल्पना द्यायला हवी होती. एकंदरीतच या सर्व प्रकरणातून संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा ईडीच्या कारवायांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे जगजाहीर आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
किरीट सोमय्या जे काही वक्तव्य करतात त्या घटना आगामी दोन-चार दिवसांमध्ये घडतात. त्यामुळे अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून त्यांची महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या कामाचा अहवाल नेहमी किरीट सोमय्यांना देत असतात असा एक आभास निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.
या कारवायांमुळे महाविकास आघाडी सरकारवर परिणाम होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकार व सरकारशी संबंधित लोकांची बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्यांच्याबद्दल संशय निर्माण करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचे चित्र आहे, असे त्यांनी सांगितले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
भाजपा ने उघड सांगावे किरीट सोमय्या राणे विखे आत्वले शेलार फडणवीस चंद्रकांत पाटील चित्र वाघ हे ट्रेनर आहेत ed cbi चे
उत्तर द्याहटवा