Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ मे, २०२२

शिरपूरमध्ये दारूची अवैध वाहतूक करणारी कार सह जितेंद्र पुनमचंद सोनिस नदूरबार हा पोलिसांच्या ताब्यात



शिरपूर प्रतिनिधी: शिरपूरमधून दारूची वाहतूक करणारे मारोती ईडीको वाहन पकडून शिरपूर शहर पोलिसांनी २,६५,२०० रुपयांची दारू आणि एक कार जप्त केली.तसेच याप्रकरणी पोलिसांनी जितेंद्र पुनमचंद सोनिस वय ४० रा.हुडको काँलनी नंदुरबार एकाला ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना वाघाडी हुन बाळदे मार्गाने दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी सापळा लावून एक कार अडवली.संशयित ईसम हा एका कारमधून नंबर (एम. एच. २१/व्ही. १२९७) देशी-विदेशी दारूच्या १९२० बाटल्या ४० बॉक्स घेऊन जाताना सापडला,याबाबत पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बागर यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तपास पोलीस कॉन्स्टेबल बांगर करीत आहेत.पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश कुटे,पोकाँ स्वप्नील बांगर,पोकाँ नरेंद्र शिंदे,पोकाँ अमित रनमाळे,पोकाँ दिपक बाविस्कर,या पथकाने ही कारवाई केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध