Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
पत्रकारास जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात अप्पर पोलीस अधीक्षकांना लोकशाही मराठी पत्रकार संघाचे निवेदन...!
पत्रकारास जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात अप्पर पोलीस अधीक्षकांना लोकशाही मराठी पत्रकार संघाचे निवेदन...!
धुळे - लोकशाही मराठी पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांना अश्लील शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या अनिल कुवर या व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन धुळे जिल्हा लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वतीने धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना देण्यात आल आहे सदरचे निवेदन लोकशाही मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक वाघ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे....
याबाबत सविस्तर माहिती अशी की लोकशाही मराठी पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा k १० न्यूज मराठी या वृत्तवाहिनीचे संपादक व शहादा येथील रहिवाशी विजय पाटील यांना दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी ८.०० वाजेच्या सुमारास शहादा शहरातील अनिल कुवर नामक इसमाने थांबवून माझी बातमी का लावली नाही, माझ्या बातम्या तू प्रसिद्ध का करत नाही? असे विचारून शिवीगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी दीली होती. तसेच तुझ्या सारख्या अनेक पत्रकारांना मी मारहाण केली आहे. अशी धमकी देत सदर व्यक्ती शहरात दहशत पसरवत असून लोकशाही ला काळीमा फासत आहे. तरी अशा घटनाबाह्य वर्तन करणाऱ्या व्यक्ती विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा, सदर अनिल कुवर या व्यक्तीकडून पत्रकार विजय पाटील यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहे.
याबाबत पीडित पत्रकार विजय पाटील यांनी नंदुरबार जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील दिल आहे मात्र नंदुरबार पोलिस प्रशासनाने अद्याप कुठलीही दखल न घेतल्यानं सदर व्यक्तीपासून या पीडित पत्रकाराच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी होणाऱ्या परिणामास नंदुरबार पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात आला आहे.संबंधित पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची कसून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक वाघ, महासचिव गणेश पवार, तालूका सचिव संदीप त्रिभुवन,धुळे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, संघटक आकाश सोनवणे,सहसचिव दिपक शिंदे,प्रवीण मोरे, रोशन खैरनार, अविनाश वाडीले, प्रमोद शिंपी आदी लोकशाही मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा