Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १३ मे, २०२२

साक्री तालुक्यातील पांझरा नदीपात्रात लाठीपाडा धरणातून आरक्षित पाणी सोडण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदनातुन विशाल देसले यांची मागणी



साक्री तालुक्यातील पांझरानदी पात्रातून व लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्यावातून पिण्याचे पाण्यासाठी आरक्षित आवर्तन सोडण्यात यावे म्हणून धुळे जिल्हाधिकारी मा जलज शर्मा साहेब यांना गेल्या महिन्यात निवेदन देण्यात आले होते त्यानुसार मा.जिल्हाधिकारी यांनी पांझरा नदी पात्रातून ५६ द.ल.घ.फू व उजव्या कालव्यातून १००.२२ द.ल.घ.फू एवढे पाणी सोडण्याचे आदेश काढण्यात आले आहेत त्यानुसार पाटबंधारे विभाग लवकरच पाणी सोडण्याची तयारी पूर्ण करणार असल्याचे उपभियंता मा कुवर मॅडम यांनी सांगितले आहे....
साक्री तालुक्यातील जीवनवाहिनी असलेला पांझरा मध्यम प्रकल्प म्हणजेच लाटीपाडा धरण हे पांझरा नदी काठावरील गावांची व काटवान परिसरातील गावांची ऐन उन्हाळयात तहान भागविण्याचे काम करत असतो.एप्रिल महिन्यानंतर नदीकाठावरील गावांची पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीची पातळी खाली जाते व ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण व्हायला नको म्हणून या प्रकल्पतील आरक्षित असलेले पाणी सोडण्यात यावे असे निवेदन मा जिल्हाधिकारी महोदय यांना एप्रिल महिन्यात देण्यात आले होते.यावेळी कासारे गावाचे लोकनियुक्त सरपंच विशाल बापू देसले यांच्या नेतृत्वाखाली विटाई गावाचे उपसरपंच निवृत्ती हिरे,मलांजन गावाचे सरपंच प्रतिनिधी परीक्षित सोनवणे,विजय जोशी,दारखेलचे धनराज भामरे,छाईलचे सरपंच चेतन थोरात,निलेश कुवर किरण खैरनार,प्रकाश जोशी, नाडसेचे विशाल भामरे आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.पाण्याचे आवर्तन मिळावे यासाठी सर्व ग्रामपंचायत मार्फत ठराव करून काही प्रमाणात पाणीपट्टी पैसे भरावे लागतात त्याचा पाठपुरावा करण्यात आला तसा प्रस्ताव तयार करून मा.जिल्हाधिकारी यांनी पाणी सोडण्याचे आदेश केले आहेत म्हणून पांझरा नदीपात्रावरील सर्व गावांचा व काटवान परिसरातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किमान २ महिन्यासाठी सुटणार आहे याचे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे लवकरच पाणी सोडण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त करण्यात आले आहे...

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध