Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
महाविकास आघाडीचे सरकार असेपर्यंत तुमच्यावर लढण्याची वेळ येणार नाही,शिसाका बाबत सकारात्मक प्रयत्न करु!
महाविकास आघाडीचे सरकार असेपर्यंत तुमच्यावर लढण्याची वेळ येणार नाही,शिसाका बाबत सकारात्मक प्रयत्न करु!
धुळे/शिरपुर (प्रतिनिधी):-आज धुळे दौऱ्यात, विचारसंवाद कार्यक्रमात खा, सुप्रियाताई सुळेंनी जिल्हावासियांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही येथे दिली.धुळे येथील एसएसव्हीपीएस इंजिनिअरींग कॉलेजच्या हॉलमध्ये लोकसंघर्ष मोर्चा तर्फे आयोजित भव्य लोकसंवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने आदिवासी,ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी जाहीरपणे लोकसंघर्ष मोर्चाच्या लोकप्रिय महिला नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी बोलाविले होते.कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख मान्यवर मंडळींच्या हस्ते,कष्टकरी वर्गाचे प्रतिक 'नांगर'चे पूजन आणि रोपट्याला पाणी देवून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभाताई शिंदे यांनी केले.संदीप देवरे व वृषभ अहिरे यांनी क्रांती गीत सादर केले.धुळे,नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सातपुडा आदिवासी भागात शिक्षण,आरोग्य,शेती व वनसंवर्धनाच्या बाबतीत जे काही प्रश्न आहेत.ते सोडविण्यासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील . जोपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार आहे,तोपर्यंत तुमच्यावर लढण्याची वेळ येणार नाही.कारण ती वेळ आम्ही येवू देणार नाही,येथील प्रश्न पुर्णपणे सोडविणे हीच आमची जबाबदारी आहे.
शिरपूर शेतकरी विकास फाउंडेशन तर्फे शिरपुरचे कामगार नेते मोहन साहेबराव पाटील,ॲड.गोपालसिंह राजपूत,
कल्पेशसिंह राजपूत,इ.सह कार्यकर्त्यांनी शिसाका सुरू करणे शिरपुर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आणि कामगार वर्गाच्या हिताचे असल्याने हा शिरपुर
शेत.सह.साखर कारखाना लवकरच सुरू करण्यासाठी निवेदन दिले.आणि यासंबंधीची जाहीर मागणी व्यासपीठावरून युवा नेते कल्पेशसिंह राजपूत यांनी शेतकरी विकास फाउंडेशन तर्फे केली.याबाबत व्यासपीठावरून संबोधित करताना सुप्रियाताई सुळे यांनी, वेळप्रसंगी शिसाका सुरू करण्यासाठी केंद्र स्तरावरही पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही दिली. लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आयोजित आदिवासी व ग्रामीण क्षेत्रातील आरोग्य , शिक्षण,शेती आणि वनसंवर्धन या विचारसंवाद कार्यक्रमाला संबोधित करतांना त्या बोलत होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे,नाजनीन शेख,नंदा मावळे , सुवर्णाताई पाटील उषाताई पाटील,डॉ. विजयाताई अहिरराव उपस्थित होत्या.खा . सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या कि,सत्ता ही सर्वसामान्यांच्या आयुष्यात मोठा बदल करण्यासाठी असते,असे ना.शरद पवार नेहमी सांगतात.तसेच २० टक्के राजकारण करा व ८० टक्के समाजकारण करा,असेही ते सांगतात.महाराष्ट्राची ओळख म्हणून खान्देश व सातपूडा हे महत्वाचे भाग आहेत.महाराष्ट्राचा ६०-६५ वर्षांचा इतिहास पाहीला तर अनेक बाबतीत खान्देशचे मोठे योगदान आहे .
त्यामुळे खान्देशातील नागरिकांनी स्वताला कमी लेखू नये खान्देशातील शेतीमाल खुप चांगला आहे.येथील महिला कष्ट खुप करतात परंतु,मार्केटींग व पॅकेजिंगमध्ये कमी पडतात.त्यामुळे चांगला भाव मिळण्यासाठी आपण पाठपुरावा केला पाहीजे अन्नप्रकिया उद्योग सुरु करुन शेतीमालाला चांगला भाव कसा मिळेल , यासाठी मी तुमच्या पाठीशी उभी राहीन , असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. प्रास्ताविकात लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी सुप्रियांताईंचे कौतुक करतानाच त्यांच्यातला माणुसकीच्या भावनेला सलाम केला.आज दिवसभर खा.सुप्रियाताईंच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम-खा.सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत आज धुळ्यात विविध कार्यक्रम होत आहेत.आज सकाळी १०.३० वाजता वाजता त्यांच्या उपस्थितीत हॉटेल स्पाईस स्ट्रिट येथे यशस्विनी सामाजिक अभियानची बैठक झाली . त्यानंतर दुपारी १ वाजता देवपूरातील एसएसव्हीपीएस इंजिनिअरींग कॉलेज येथे लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आयोजित आदिवासी व ग्रामीण क्षेत्रातील आरोग्य , शिक्षण,शेती आणि वनसंवर्धन या विचारसंवाद कार्यक्रम झाला.तर सायंकाळी ४ वाजता त्यांची पत्रपरिषद झाली.तसेच संध्या.५.३० वाजता काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय येथे हरिजन सेवक संघातर्फे आयोजित राष्ट्रीय एकात्मता संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या.संध्या.६ वाजता राकां नेते राजेंद्र सोलंकी यांच्या तरुण मुलगा उमेश सोलंकी(वय ३५) नुकताच ट्रक व २ दूध टँकरच्या भीषण अपघातात जळगांव जिल्हयात मुक्ताईनगर येथे वारला.त्यांचे घरी जाऊन सोलंकी कुटुंबीयांना सांत्वना दिली.त्यानंतर सायंकाळी ७ वाजता त्या जळगावकडे मार्गस्थ होणार आहेत .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा