Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ मे, २०२२

सहकार विभागाने अधिसंख्य पदाचे आदेश न दिल्याने ऑफ्रोह चे महाराष्ट्र दिनी धरणे आंदोलनाचा एल्गार !महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रात न्याय मिळणार काय?



बुलढाणा (प्रतिनिधी):बुलढाणा जिल्हा  केंद्रीय सहकारी  बॅन्केच्या 12 सेवासमाप्त कर्मचा-यांना महाराष्ट्र शासनाच्या 21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र.4.2 नुसार अधिसंख्य पदाचे आदेश गेले 27 महिने मिळाले नाहीत. शासनाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सहकार आयुक्तांसह मंत्रालयातील सहकार विभाग,बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बॅकेला व जिल्हा निबंधक यांना 27 महिनेचा कालावधी लोटला.तरीही  अधिसंख्य पदाचे आदेश मिळाले नाहीत.
हा अन्यायच आहे.गेली दोन वर्ष  या अन्यायाविरूद्ध 'ऑफ्रोह' चे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री.चंद्रभान सोनुणे  हे सातत्याने आंदोलन करीत आहेत.  आता तरी न्याय मिळावा,यासाठी 1 मे पासून  जिल्हा निबंधक कार्यालयासमोर  बेमुदत धरणे आंदोलनाला सुरूवात कारण्यात आली आहे.या आंदोलनाला ऑफ्रोह संघटनेचाही खंबीर पाठिंबा आहे.


बुलढाणा  येथील पावसाळ्यातील साखळी उपोषण,10 डिसेंबर 2020 चे मंत्रालयासमोरील आत्मदहन आंदोलन पुण्याच्या सहकार आयुक्त कार्यालयासमोरील 15 ऑगष्ट ते 24 ऑगष्ट 2021 चे साखळी उपोषण..अशी आंदोलनाची मालिकाच सोनुणे व  त्यांच्या सहका-यांनी उभी केली.मात्र सहकार खात्याला अजूनही शासनाच्या 'मानवतावादी दृष्टीकोना'चा 'अर्थ' कळला नाही,यांबद्दल  नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने  निर्णय घेवून हा शासन निर्णय  काढला तरी या शासन निर्णयातील मुद्दा क्र.4.2 ची अंमलबजावणी झाली नाही.

या शासन निर्णयातील मुद्दा क्र.4.2 ची अंमलबजावणी  करून आम्हाला न्याय द्या  एवढीच माफक अपेक्षा या 12 सेवासमापत कर्मचा-यांची आहे .आज 1 मे महाराष्ट्राचा स्थापना दिन..कामगार दिन मात्र याच महाराष्ट्रात न्याय मिळविण्यासाठी..महाराष्ट्र शासनाच्या  शासन निर्णयातील एका मुद्दयाची अंमलबजावणी करण्यासाठी उपोषण करावं लागतं.विशेष म्हणजे एका मुलांसह त्यांच्या सवंगड्यांना न्याय मिळवून  देण्यासाठी 72 वर्षाच्या वृद्ध मातेला-समिंद्राबाई सोनुणे यांनाही उपोषणाला बसावं लागतं.घरच्या धन्याला नयाय मिळावं म्हणून चंद्रभान जींच्या पत्नी सौ.  छाया सोनुणे यांना उपोषणाला बसावं लागतं.संपूर्ण सोनुणे कुटुंब आज महाराष्ट्र दिनी उपोषणाला बसले आहेत.यासोबत 
त्यांचे सहकारीही-सुरेश खोडके,गोविंद सिंग रबडे ,समाधान पेले,संजय पवार , गजानन धीरबशी,सुभाष कटारे,संतोष तायडे हे ही उपोषणाला बसले आहेत.  सोनुणेजींनी अधिसंख्य पदाचे आदेश मिळेपर्यंत हे आंदोलन बंद करणार नाही असा वज्रनिर्धार केला आहे.

या 12 सेवासमापत  कर्मचा-यांना शासन आदेशानुसार अधिसंख्य पदाचे आदेश मिळणार काय? महाराष्ट्र  दिनी सुरू केलेलया या आंदोलनाने तरी महाराष्ट्रात न्याय मिळावा.अशी मागणी आफ्रोह चे प्रसिद्धी प्रमुख  गजेंद्र पौनीकर यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध