Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ मे, २०२२

१ मे जागतिक कामगार दिनानिमित्त गुणवंत कामगार पुरस्कार



१ मे जागतिक कामगार दिनानिमित्त गुणवंत कामगार पुरस्कार व आर्थिक वर्ष २०२१ - २०२२ यामध्ये विक्रमी वीज बिल वसुली,वीज गळती कमी करणे,वीज ग्राहकांना योग्य व तत्पर सेवा देणे याकामी बारामती परिमंडळ अंतर्गत सोलापूर शहर ई उपविभाग प्रथम क्रमांक आल्याबद्दल बारामती येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, बारामती येथे आयोजित कार्यक्रमात बारामती परिमंडळ मुख्य अभियंता मा. श्री.सुनिल पावडे साहेब,बारामती ग्रामीण मंडळ अधीक्षक अभियंता मा.श्री. चंद्रशेखर पाटील साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह ( पुरस्कार ) स्वीकारताना सोलापूर शहर ई उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता मा.श्री.चंद्रकांत दिघे साहेब,उपविभागातील शाखा अभियंता श्री.पुंडलिक कुंभार,श्री.प्रेम राठोड,श्री. सुधीर ननवरे,श्री.अमोल पंढरे,सौ.कोमल सुरवसे,सौ.सुनंदा मशाळ,विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर मंडळ ( सर्कल ) अध्यक्ष श्री. सुनिल काळे, ईश्वर वळवी, ज्ञानेश्वर घोडके, आनंद फुलारी व इतर मान्यवर उपस्थिती होते.तसेच याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील २५ तांत्रिक कामगारांना व ०५ उपकेंद्र यंत्रचालक यांना गुणवंत कामगार पुरस्कार, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध