Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० मे, २०२२

शिरपुर बसस्थानकावर सोन्याची मंगलपोत लांबविल्याची घटना..! अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंद



शिरपूर प्रतिनिधी :- लग्न समारंभाचा कार्यक्रम उरकून गावी परतणाऱ्या 64 वर्षीय महिलेची बस मध्ये बस मध्ये चढतांना अज्ञातांनी चोरट्यांनी 25 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत लांबविल्याची घटना काल 19 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शिरपुर बसस्थानकावर घडली असून शहर पोलीसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अजंदे बु.येथील समजकोर खुशालशिंग राजपूत या 64 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

शिरपुर तालुक्यातील अजंदे बु.येथील समजकोर राजपूत ही महिला दोंडाईचा येथे नातेवाईकांकडे लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेली होती दरम्यान गुरुवारी कार्यक्रम आटोपून दोंडाईचा येथून भावाच्या कारने दुपारी अडीच वाजेपर्यंत शिरपुर येथे बसस्थानकावर आली आणि आढेमार्गे जाणारी जळगांव बसने अजंदे येथे जाणार होती.

दुपारी तीन वाजेच्या सुमारास बस लागली असता बसमध्ये चढत असतांना एका पुरुषाचा धक्का लागल्याने संशय आला बसमध्ये चढल्यानंतर गळ्यात पाहिले असता गळ्यातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत दिसून आली नसल्याने कोणीतरी अज्ञाताने ती लांबविल्याचे लक्षात आले.तिने तात्काळ बस स्थानक प्रमुखांना व पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोहेकॉ ललित पाटील,पोना मनोहर पिंपळे,पोकॉ गोविंद कोळी,विनोद आखडमल,प्रवीण गोसावी,
प्रशांत पवार,मनोज दाभाळे यांनी धाव घेत घटनास्थळाची व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली मात्र काही आढळून आले नाही.

याप्रकरणी रात्री तक्रार दाखल झाल्याने उशिरा अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय संदीप मुरकुटे करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध