Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० मे, २०२२

झेप प्रतिष्ठान आणि इतर सामाजिक संस्थाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर



ठाणे अक्षय कदम प्रतिनिधी:स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ठाण्यात झेप प्रतिष्ठानसह विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून २ऱ्या वर्षी भव्य रक्तदान शिबिर ठाण्यातील मावळी मंडळ येथे १४ मे रोजी आयोजित करण्यात आलेले होते.या उपक्रमात १८ते २० वर्षातील तरुण ते ६० वयापर्यंतचे ठाण्यातील जवळपास १५३ जणांनी रक्तदान शिबिरात उपस्थित राहून रक्तदान केले.या उपक्रमात रिक्षाचालक ते ऑफिस मधून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन आलेले लोकानी या शिबिरात मोलाचे सहकार्य केले.याच उपक्रमाच्या दरम्यान ५ वर्षाच्या चिमुकलीने पोवाडा सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.मूकबधीर असलेले राजेश महाडिक आणि दिव्यांग असलेले अमित देसाई यांनी सुद्धा रक्तदान केले.७६ वेळा रक्तदान करणाऱ्या विशाल खांडेकर यांचा या उपक्रमात विशेष सत्कार ही करण्यात आला तसेच सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. 
               
या उपक्रमाचे उद्घाटन ठाणे तहसीलदार युवराज बांगार यांनी केले तसेच उपक्रमासाठी ठाणे ग्रामीण अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्मिता पाटील मॅडम यांनी महापुरुषांना सामाजिक भान जपत साजऱ्या केलेल्या या उपक्रमाचे आणि आयोजकांचे कौतुक केले.या उपक्रमात पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून प्लास्टिकचा कमीत कमी वापर करत संपूर्ण उपक्रमात पेपर ग्लास आणि पेपर प्लेट चां वापर करण्यात आला.या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन झेप प्रतिष्ठान,मराठा जागृती मंच पानिपत ठाणे विभाग,मराठा क्रांती सेवा संघ,सह्याद्री प्रतिष्ठान,मराठा उद्योजक लॉबी,मातोश्री प्रतिष्ठान,श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान,हाक तुमची साथ आमची सामाजिक संस्था,छावा ढोल ताशा पथक ठाणे,मावळा संघटना इत्यादी संस्थांनी मिळून केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध