Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ मे, २०२२
बोरगांव येथे शेत शिवार रस्ताचे आमदारांनी केले भूमिपूजन
शिरपूर प्रतिनिधी: तालुक्यातील बोरगांव येथे आमदार श्री काशिराम पावरा यांच्या शुभहस्ते शेत शिवार रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या 3054 या योजनेतून वनावल गटातील जि.प.सदस्या सौ अभिलाषा भरत पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे बोरगाव शिवारातील शेतरस्ता मंजूर झाला.
शिसाका संचालक तथा माजी पं स. सदस्य श्री भरत भिलाजी पाटील, पं स. माजी उपसभापती श्री जगतसिंग राजपूत, बाळदे उपसरपंच श्री निंबा तोताराम पाटील व बोरगांवचे उपसरपंच श्री योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन समारंभ पार पडला.
माजी शिक्षण मंत्री श्री अमरिशभाई पटेल, आमदार श्री काशीरामदादा पावरा, प्रियदर्शिनी सूतगिरणी चेअरमन श्री भुपेशभाई पटेल,जि.प.अध्यक्ष श्री तुषारभाऊ रंधे,उपाध्यक्ष सौ कुसुमताई कामराज निकम,माजी नगरसेवक बापूसो श्री अशोक कलाल,माजी नगराध्यक्ष रावसाहेब श्री प्रभाकर चव्हाण यांच्या सहकार्यातुन व मार्गदर्शनाखाली वरील शेतशिवार रस्ता मंजूर करण्यात आला आहे.
बोरगाव शिवारात बोरगाव, जातोडा तसेच हिंगोणी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी शेतकरयांना खूपच त्रास सहन करावा लागत होता. आता शेतरस्ता बनणार असल्या मुळे परिसारातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष तथा बोरगांव उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सैनिक दगेसिंग राजपूत, विठ्ठल झुलाल कोळी, कौतिक तोताराम येशी, गुलाब फ़ुला भिल, ग्राम पंचायत सदस्य तानकू भिल, पांडुरंग कोळी, बापू भिल, दीपक राजपूत, योगेंद्र दगेसिंग राजपूत, ग्रामसेवक पी. बी. सोनवणे, पोलीस पाटील मनोहर जयराम पाटील, पत्रकार अमोल राजपूत, धुडकू भिल, दिलीप गुलाब भिल, दरबारसिंग राजपूत, गोपीचंद भिल, धनसिंग शाना भिल, जातोड्याचे माजी उपसरपंच जयसिंग राजपूत, बोरगांव-जातोडा-हिंगोणीचे शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा