Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० मे, २०२२

शिंदखेडा शहरासह तालुक्यात शिवसंपर्क अभियानांतर्गत विविध ठिकाणी विकास कामांचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते भूमिपूजन व अभियान मार्गदर्शन

   

शिंदखेडा ( प्रतिनिधी )शिंदखेडा तालुका शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या शिवसंपर्क अभियानांतर्गत शहरातील कालनीसह तालुक्यात विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन व शिवसंपर्क अभियानांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम शिर्डी मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.हयाप्रसंगी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे सह पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दि.26 मे 29 मे 2022 दरम्यान शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करत धुळे जिल्हा ग्रामीण मधिल शिंदखेडा मतदार संघात विविध विकास कामांचा भुमीपुजन व गाव तिथे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहुन शिवसेनेची ध्येय धोरणे आणि योजना आणुन प्रत्यक्ष जनतेलाच जाऊन त्याद्वारे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यापाश्वभुमीवर शिंदखेडा शहरातील वार्ड क्रं 9 मध्ये शिवसेनेचे पराभूत झाल्यानंतरही विनायक पवार यांनी पाठपुरावा करून दोन रस्त्याच्या काँक्रीट करण्यासाठी जवळपास साठ लाख रुपये चा निधी मंजूर करून घेतला तसेच वार्ड क्रं 10 बी.के.देसलेनगर मधील शिवसेनेचे प्रवक्ते प्रा.प्रदीप दिक्षीत व पत्रकार यादवराव सावंत यांनी पाठपुरावा करून जवळपास 57 लाख रुपये चा निधी मंजूर करून घेतला आणि स्वामी समर्थ केंद्र वरुळ रोड येथे सभामंडपासाठी शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील यांनी पाठपुरावा करून 25 लाख रुपये चा निधी मंजूर करून घेतला. तसेच नेवाडे ते वरपाडे रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 61 लाख रुपये चा निधी मंजूर केला आहे. शिवाय शिंदखेडा रेल्वे स्टेशन ते भडणे तीन किमी साठी 1 कोटी 31 लाख रुपये चा निधी मंजूर झाला तर यासाठी भडणे सरपंच गिरीश देसले यांनी पाठपुरावा केला असून त्याचे भुमिपुजन शिर्डी मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

ह्यावेळी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे , सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे,हिलाल आण्णा माळी,जिल्हा संघटक मंगेश पवार, जिल्हा समन्वयक भरत राजपूत , उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख संधटक भाईदास पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, तालुकाप्रमुख गिरीश देसले,ग्रामीण तालुका प्रमुख ईश्वर पाटील, शहराध्यक्ष संतोष देसले,प्रवक्ते प्रा.प्रदिप दिक्षीत, तालुका समन्वयक विनायक पवार, एस.डी.पाटील,माजी शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील,संजय पहाडी, यांसह नगरपंचायत माजी प्र नगराध्यक्ष दिपक देसले, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक उदय देसले,अशोक बोरसे,महेंद्र माळी,प्रकाश चौधरी,जगदीश बडगुजर,शरद पाटील, भडणे येथील सरपंच गिरीश देसले , उपसरपंच जगतसिंग गिरासे,संजय देसले , पोलिस पाटील युवराज माळी,सतिष माळी,गोविंद पाटील,अशोक पाटील,
भिकन पाटील,आनंदा पाटील, विठोबा पाटील यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

ह्या प्रसंगी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी सांगितले की, शिंदखेडा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये विकासाची कामे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पहिल्या टप्प्यात जवळपास चार कोटी रुपये चा निधी मंजूर करण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार,संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या कडे पाठपुरावा करून नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली निधी मंजूर केला. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून विविध विकासाची कामे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.शिंदखेडा शहरातील नगरपंचायत ची नुतन इमारत उभी करण्यासाठी पाठपुरावा करून निश्चितच येणाऱ्या काळात मंजुर करुन आणण्याचे आश्वासन दिले. शहरातील सर्व कामांसाठी नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे व गटनेते अनिल वानखेडे व सर्व नगरसेवक यांनी ठराव संमत करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे म्हणून त्यांचे ह्यावेळी विशेष आभार मानले.शहराच्या विकासासाठी सर्व पक्षीय एकत्र येऊन कोणत्याही प्रकारची राजकारण न करता विकासासाठी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. 

खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिंदखेडा तालुक्यातील आज जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन माझ्या हस्ते करण्यात आले त्यांचे व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे विशेष आभार मानतो आणि भविष्यात कोणत्याही विकास कामांसाठी मी स्वतः लक्ष घालून मदत करणार असून माझे सहकार्य राहील.म्हणुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातील एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी आपण सच्चा कार्यकर्ता ला निवडुन देण्यासाठी प्रयत्न करावा त्यासाठी आपल्या मतदारसंघात पोषक शिवसेनेचे वातावरण असुन हेमंत साळुंखे सारख्या होतकरू विकासाची गंगा खेचून आणणारा सच्चा कार्यकर्ता ला एकदा विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर दोंडाईचा येथील सुवर्ण कार मंगल कार्यालयात शिवसैनिक मेळावा संपन्न झाला. अशा रितीने शिवसंपर्क अभियानाची सांगता करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध