Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
चोपडा तालुक्यातील हातेड व काजीपुरा येथे कपाशीच्या बोगस बियाणे विक्रेत्यावर धाड सव्वाचार लाखांची ३३३ पाकीट बियाणे जप्त; ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
चोपडा तालुक्यातील हातेड व काजीपुरा येथे कपाशीच्या बोगस बियाणे विक्रेत्यावर धाड सव्वाचार लाखांची ३३३ पाकीट बियाणे जप्त; ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी:जिल्हा कृषी अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी अरुण तायडे यांनी रविवारी संध्याकाळी 4 बाजता अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील हातेड बु येथील बसस्टैंड जवळील लक्ष्मी गॅरेजवर अचानक धाड टाकली असता एका पिशवीत प्रतिबंधित असलेले पिंक कॉट १०० एचटीबीटी हायब्रीड बोगस कापुस बियाणे आढळून आले.या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी तायडे यांच्या फिर्यादी वरून काजीपूरा येथील दत्तात्रेय शालीग्राम पाटील यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जळगाव येथील गुणवत्ता नियंत्रकअधिकारी अरुण श्रीराम तायडे यांना दि.२९ मे रोजी रविवारी दुपारी ११ वाजता हातेड बु.येथे बसस्टैंड जवळ असलेल्या लक्ष्मी गॅरेजवर गुजरात राज्यातील विना परवाना पिंक कॉट कापुस बियाणे विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.ंंत्यानंतर जिल्हा पोलिसांचा अतिरिक्त फोर्स मागवून कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता नियंत्रक जिल्हा कृषी अधिकारी ठाकूर अधिकारी अरुण श्रीराम तायडे व कृषी सहाय्यक दीपक नेताजी पाटील यांना सोबत घेऊन खासगी वाहनाने दत्तात्रेय शालीग्राम पाटील असल्याचे (एचटीबीटी तपासणीसाठी) पंचांसमक्ष लक्ष्मी गॅरेजवर अचानक धाड़ टाकून एका गोणीत भरलेले पकडले. गुजरात राज्यातील विना परवाना पिंक कॉट १०० एचटीबीटी हायब्रीड कापसाचे बोगस बियाणे ताब्यात घेऊन गॅरेज मालक प्रविण श्रावण पाटील यास बोगस कापूस बियाण्याच्या पाकिटा विषयी विचारणा केली असता बियाणे दत्तात्रेय शालीग्राम पाटील रा.काजीपूरा यांचे असल्याचे सांगितले तसेच बोगस कापूस बियाणे विक्रीशी माझा कुठलाही संबंध नसल्याचे देखील प्रवीण पाटील याने अधिकाऱ्यांना सांगितले.त्यानंतर त्यांच्याकडे एका पिशवीमध्ये गुजरात मधील पिंक कॉट एचटीबीटी हायब्रीड कापूस बियाणेचे २० पाकीट आढळून आले. फाट्यावरून आम्ही त्यांना सोबत घेवून काजीपूरा गावात येऊन दत्तात्रेय पाटील यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता, त्यांच्या घरात गुजरात मधील विनापरवाना पिंककॉट एचटीबीटी हायब्रीड कापसाच्या बोगस बियाण्याचे ३०३ पाकीट आढळून आल्याने ताब्यात घेवून शासकीय पंच व पोलिसां समक्ष बोगस बियाण्यांचे ४,१६,२५० किमतीचे 333पाकीट आढळून आले.
एका पाकिटाची किंमत १२५०/- रुपये प्रमाणे आहे.जमा करण्यात आलेली सर्व बोगस बियाण्यांची पाकिटे ग्रामीण पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली. त्यापैकी दोन बोगस पाकीट बियाणे विश्लेषणासाठी एचटीबीटी तपासणीसाठी पांचासमक्ष जळगाव येते पाठवण्यात आले .याबाबत जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी अरुण श्रीराम तायडे (५३) रा.जळगाव यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनला अनाधिकृतपणे एचटीबीटी कापुस बियाणे विक्री करण्याच्या उददेशाने साठवणुक करणे हे बियाणे नियम १९६८ चे कलम १०.१५.१६ व १७ चे उलंघन केले म्हणून तात्रेय शालीग्राम पाटील रा. काजीपूरा यांचे विरुद्ध विना परवाना बियाणे साठवणुक केल्याने बियाणे नियंत्रण आदेश १९८३ चे खंड ३,४,७,८ (अ) व १९ चे उल्लंघन केले आहे.,वीणा परवाना साठवणूक व विक्री केल्यामुळे बियाणे कायदा १९६६ चे कलम २(८).२ (९).२(११) व ७(-)७(उ) (क) व १४ (ए) चे उलंघन केले आहे;महाराष्ट्र कापुस बियाणे (पुरवठा वितरण व विक्रि किंमत निश्चितीकरण चे नियमन) कायदा २००९ कलम २ (१) (३) (८) (९), ११(१), १२(१) चे उलंघन केले आहे;Genetic Engeneering proval Committee (GE-C) चा मान्यतेचा उल्लेख नसल्यामुळे पर्यावरण संरक्षण कायदा १९८७चा कलम ७ व ८चे तसेच Rules For Manufacture, use Imporn. Exporn snd Storage off hazardous microrganisms १९८३ चे नियम ७ (१), ७ (४), ८व १० चे उलंघन केलेले आहे.त्यामुळे संशयीत बंदी असलेले बोगस कापुस बियाणे चे उत्पादन,वितरण साठवणूक व विक्री केलेली आहे म्हणून बियाण्याचे उत्पादक कंपनी व बियाण्याचे कंपनीचे मालक त्यामुळे संशयीत बंदी असलेले बोगस कापुस बियाणे चे उत्पादन, वितरण साठवणूक व विक्री केलेली आहे म्हणून बियाण्याचे उत्पादक कंपनी व बियाण्याचे कंपनीचे मालक यांचा विरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा