Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० मे, २०२२

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात बोगस कापूस बियाणे शोध पथके नावापुरतेच



धुळे जिल्ह्यासह तालुक्यातील कृषी केंद्रांवर अधिकृत कंपन्यांचे कापूस बियाणे उपलब्ध असले तरी ते विक्री करण्याची अद्याप विक्रेत्यांना परवानगी नसल्याने बोगस बियाणाची सर्रास विक्री होत आहे. असे बियाणे विक्री करताना त्याची कुठलीच पावती शेतकऱ्यांना दिली जात नसल्याने व त्याविषयी शेतकरी (Farmer) देखील तक्रार करीत नसल्याने कृषी विभागाला कारवाई करताना मर्यादा येत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध राहणार असून सध्याचे वातावरण लक्षात घेता, पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
तालुक्यातील विशेषतः ग्रामीण भागात शासनाची अधिकृत परवानगी नसलेले मध्यप्रदेशातील बोगस कापूस (Cotton) वाणाचे बियाणे छुप्या पद्धतीने जादा दराने विकले जात आहे. या संदर्भात कृषी विभागाकडून एकाही दुकानदाराची साधी चौकशी देखील आतापर्यंत झालेली नाही. त्यामुळे असे बियाणे विक्री करणाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध तर प्रस्थापित केलेले नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. बोगस बियाणे विक्रीमुळे शेतकऱ्यांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे
१ जूनपासून विक्रीला परवानगी
जिल्ह्यातील शहरासह तालुक्यातील कृषी केंद्र चालकांकडे १ ते १० मे दरम्यान अधिकृत कंपन्यांचे कापूस बियाणे उपलब्ध झाले आहे. मात्र, हे बियाणे विक्री करण्याची त्यांना अद्याप परवानगी मिळालेली नाही. १ जूनपासूनच त्यांना बियाणे विक्री करता येणार आहे. शेतकरी मात्र पेरणीसाठी आग्रही असल्याने जादा दराने विकले जात असलेले बियाणे खरेदी करीत आहे. आतापर्यंत बोगस बियाण्यांचे हजारो पाकिटे विक्री झाल्याचे दिसून येत आहे. मागीलवर्षी अकुलखेडा गावानजीक बोगस बियाणे विक्रेत्यावर गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली होती. अशा प्रकारचे बियाणे विकले जाऊ नये, यासाठी भरारी पथके नियुक्त केलेली आहेत. मात्र, या पथकाने तालुक्यात साधी चौकशी देखील केलेली नाही.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध