Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० मे, २०२२

माहिती अधिकार कार्यकर्ता यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी तहसीलदारांना निवेदन



शिरपूर प्रतिनिधी - माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल देवराव ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच हत्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियास दहा लाख रूपयांची आर्थिक मदत मिळाली यासाठी धुळे जिल्हा व शिरपूर तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार शिरपूर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले असून या निवेदनाची दखल घेत माहिती अधिकार कार्यकर्ता न्याय मिळवून देण्याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करावा यासाठी विनंती करण्यात आली.


यवतमाळ जिल्हा घाटंजी तालुक्यातील पारवा या गावातील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार यांची १५ मे २०२२ रोजी मध्यरात्री अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. माहिती अधिकार अधिनियमानुसार माहिती मागीतली म्हणून सूड भावनेने सदर क्रूर हत्या झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासातून आणि प्रसार माध्यमातून समोर आले आहे.

सदर घटना ही धक्कादायक असून महाराष्ट्रांच्या प्रागतिक परंपरेला काळीमा फासणारी आहे. शासन व प्रशासन भ्रष्टाचार मुक्त, लोकाभिमुख व पारदर्शक चालावे म्हणून काम करणाऱ्या हजारो माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे जागरूक व संवदेनशील नागरिकांचे मनोधर्य खच्ची करणारी सदर घटना आहे.सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ,महाराष्ट्र खालील प्रमाणे मागणी करीत आहे.

१.मृत अनिल देवराव ओचावार यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषी आरोपीना सहा महिन्याच्या आत कठारातील कठोर शिक्षा मिळावी.

२. या प्रकरणात व कटात सामील असू शकणारे व अपराध्याला चिथावणी देणारे सरकारी अधिकारी व सूत्रधार यांच्याही मुसक्या अवळाव्यात आणि त्यांना आरोपी करून कसून चौकशी करावी. ३. माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून जीव घोक्यात घालून काम करून प्रशासन व शासन पारदर्शक चालावे म्हणून आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या मृत कार्यकर्ता अनिल देवराव ओचावार यांच्या

कुटुंबियांना किमान दहा लाख रूपयांची आर्थिक मदत सरकारने जाहिर करावी.

४. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना धमक्या देणे, हल्ले करणे, मारहाण होणे व त्यांच्या हत्या होणे अशा घटनांमध्ये वरचेवर वाढ होत आहे. ही गंभीर बाब आहे. माहिती अधिकार कार्यकत्यांची सुरक्षा व सरंक्षण या सबंधी शासनाने धोरणात्मक उपाययोजना अंमलात आणणे आवश्यक आहे. शासनाने या संबंधी कडक उपाय योजना कराव्यात.

५.माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आवश्यक तेथे तातडीने पोलीस संरक्षण मिळणे अत्यावशक आहे.वरील मागण्यांचा आपण गंभीरपणे विचार करून अंमल करावा ही विनंती.अशा प्रकारच्या मागणीचे पत्र तहसीलदार शिरपूर यांना देण्यात आले असून याप्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघा चे जिल्हाध्यक्ष पुनमचंद मोरे, शिरपूर तालुका अध्यक्ष अशितोष वाडीले शिरपूर तालुका प्रचारक माधवराव जोरी संघटक देवेंद्र पवार उपाध्यक्ष संतोष भोई धुळे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा शेटे प्रचार प्रमुख जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर पाटील जिल्हा संघटक महेंद्र जाधव सुनील मारवाडी व तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध