Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २१ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
पांझरा कांन साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा संदर्भात पांझरा कांन बचाव संघर्ष समिती यांची बैठक पार पडली
पांझरा कांन साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा संदर्भात पांझरा कांन बचाव संघर्ष समिती यांची बैठक पार पडली
पांझरा कान सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्याच्या उद्देशाने आणि चर्चेसाठी आज साक्री येथे पांझरा कांन बचाव संघर्ष समितचा वतीने सर्वपक्षीय व सर्व संघटना,समित्या यांची एक संयुक्त बैठक बोलावली होती. आणि त्यात पांझरा कान साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी एका खाजगी उद्योजकाला द्यावा किंवा नाही यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याचे सांगण्यात आले.पांझरा कांन हा साक्री तालुक्यातील एक मोठा प्रकल्प आहे तो साक्री तालुक्यातच त्याच ठिकाणी त्याच जागेवर त्याच परिस्थितीत त्याच नावाने चालवावा या प्रामाणिक हेतूने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आजवर भाडेतत्ववार पाझरा कान हा साखर कारखाना चालवण्यासाठी अनेक उद्योजक आलेत परंतु त्यांना ते काही कारणास्तव शक्य झाले नाही. किंवा शक्य होऊ दिले नाही.तो भाग वेगळा परंतु असे म्हणता येईल की आता ही संदी पुन्हा आपल्यासाठी आलेली आहे. एक युवा उद्योजक पवन मोरे हे हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी तयार आहेत व त्यांनी तयारी दाखवली आहे. या सर्व चर्चेनंतर साक्री तालुक्यात एक आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. परंतु काही वेगवेगळ्या अफवांनी कारखाना सुरू करण्यात अडथळा निर्माण केला आहे. त्यावरच विचार विनिमय करण्यासाठी या बैठकीत सल्ला मसलत होणे गरजेचे आहे. आज साक्री शहराचा बाल आनंदनगरी येथे सर्वपक्षीय विविध संघटना समित्या यांच्या उपस्थितीत ही सकारात्मक चर्चा होणे अपेक्षित आहे. पाझरा कान सहकारी साखर कारखाना आहे त्याच जागेवर, आहे त्या कंडिशन्स मध्ये, लवकर चालू करावा या प्रामाणिक हेतूने चर्चा करण्यासाठी सर्व पक्ष संघटना या एकवटल्या आहेत, त्यातील अनेक गैरसमजांना वाव मिळत होता की काही प्रमाणात कारखान्यातील भंगार विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला, बोर्ड लावण्यात आला तो परत काढण्यात आला अशा नेक अनेक चर्चा तालुक्यात उधाण आले आहे,म्हणून यावर सत्यता जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले याचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माननीय तुळशीराम गावित होते. यात कारखाना वरील चर्चेला प्रत्येक नेत्यांनी आपापले विचार कारखान्यात संदर्भात मांडले त्यातच किरकोळ वाद निर्माण झाला व तेवढा वेळ सभा थांबवण्यात आली. यावर बोलताना पवन मोरे यांचे प्रतिनिधी म्हणून श्री.धनंजय अहिरराव यांनी असे सांगितले की 30 मे 2022 रोजी भाडेतत्त्वावर देण्याचा करार पूर्ण होईल त्यानंतर एक ते दीड वर्षात या कारखान्यातून सोन्याचा धूर निघेल अशी ग्वाही मी पवन मोरे यांच्या वतीने देतो आहे असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी धनंजयराव म्हणाले की कुठल्याही अफवांना बळी न पडता या युवा उद्योजक का च्या पाठीमागे तालुक्यातील जनतेने प्रामाणिकपणे उभे राहिले पाहिजे. तर भविष्यात या तालुक्याला सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन श्री अहिरराव यांनी आपल्या अभिभाषणात केले. यातच सर्वपक्षीय नेत्यांनी संघटनांनी,समित्यांनी त्यांच्या-त्यांच्या पदाधिकारीनी कारखान्यात चालू व्हावा याविषयी आपली प्रतिक्रिया ठामपणे मांडली. आजपर्यंत साक्री तालुक्यात कुठलेही उद्योग किंवा मोठा प्रकल्प नसल्याने बेरोजगारीचा प्रमाण मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे आणि जर साक्री सारख्या शहरात एखादा उद्योग हा प्रकल्प कार्यान्वित होत असेल तर हीच साखरी तालुक्यातील जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करून हा कारखाना कसा पुन्हा चालू करता येईल यावर वेगवेगळ्या चर्चा न करता यातून काय चांगलं करता येऊ शकते व काय सकारात्मक करता येईल यावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा