Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ मे, २०२२

भारताचे माझी पंतप्रधान तसेच संगणकाचे प्रणेते स्व: राजीव गांधी याना स्मृतीना विनम्र अभिवादन



स्टार सन ते प्रोफेशनल पायलट, राजकारणी, भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान, लोकसभेच्या 542 पैकी 411 जागा जिंकण्याचा विक्रम, संगणक ते पंचायती राज, टाळं लागलेलं विवादित राम मंदिर भक्तांसाठी खुलं करणं, मॉडर्न-डिजिटल भारताचे प्रणेते, ह्याचं मातीत दुर्दैवी अंत आणि मग भारतरत्न..!!
हा थोडक्यात प्रवास आहे भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीं यांचा. बऱ्याच लोकांना राजीवजी ह्या प्रवासातल्या एखाद्या गोष्टीमुळे आवडत असतील वा खटकत असतील...किंवा वर लिहिलेल्या एखाद्या मुद्द्याव्यतिरिक्त एखाद्या दुसऱ्या मुद्द्यामुळे आवडत वा खटकत असतील.
इतर बऱ्याच गोष्टी असल्या तरी मला राजीवजी एकाचं गोष्टीमुळे जास्त भावतात. ती म्हणजे, राजीवजींना कुठून तरी खबर लागली की अटलजींना किडनीचा त्रास आहे...त्या उपचारांसाठी त्यांना अमेरिकेला जायचं आहे..परंतु आर्थिक कारणामुळे ते शक्य नाही. तेव्हा राजीवजींनी न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्रात जात असलेल्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश केला व ह्या संधीचा फायदा उचलत उपचार करून घेण्यास सांगितले.
राजीवजींच्या हत्येनंतर स्वतः अटलजींनी उद्गार काढलेले की, "मी आज जिवंत आहे, तो केवळं राजीव गांधींमुळे!"
तसं पहायला गेलं तर अटलजी हे विरोधकांचे प्रमुख शिलेदार..आपल्या परखड भाषणांनी कायम सरकारला, गांधी घराण्याला धारेवर धरणारे नेते. त्यांच्याविषयीं सुद्धा इतकी आपुलकी फक्त गांधी विचारच बाळगू शकतो.
त्यामुळे असा, विरोधकाची सुद्धा काळजी घेणारा नेता असणं फारच दुर्मिळ...हीच खरी गांधींची शिकवण आहे...आणि हीच खरी भारताची ओळख आहे..जी आज संकटात आहे..!! म्हणूनच देशात सध्या तयार केल्या गेलेल्या ह्या द्वेषपूर्ण वातावरणात सदभावना जपणारा एक 'राजीव' पाहिजे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध