Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० मे, २०२२

धुळे जिल्ह्यातील शेतकरी राजाला आपल्या सातबारावरील पोटखराब क्षेत्र लागवडी लायक करण्याची सुवर्णसंधी



महाराष्ट्र शासनाने दिनांक 19-08-2019 शासनाच्या निर्णय परिपत्रकानुसार अ,वर्ग पोट खराबा क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी ते क्षेत्र लागवडी खाली आणले असल्यास सदर पोट खराब क्षेत्राची नोंद सात बाऱ्यावरवर लागवडी योग्य क्षेत्र म्हणून नोंद घेण्याचा क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यात सदरचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधूंनी आपल्या गावचे संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधून विहित नमुन्यात अर्ज दाखल करायचा आहे  अर्जासोबत आपल्या शेताचा गटाचा सातबारा उतारा जोडावा. सदर प्राप्त अर्जाची पडताळणी करून मंडळ महसूल अधिकारी यांच्यामार्फत सूक्ष्म निरीक्षण करता येईल. व त्यानंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्यामार्फत पोटखराबा क्षेत्राची आकारणी ही निश्चित होईल. आकारणी निश्चित झाल्यानंतर तहसीलदार यांच्याकडून पोट खराबा क्षेत्र लागवडीखालील क्षेत्रात समाविष्ट करण्याचे आदेश पारित होतील. सदर प्रक्रिया अत्यंत सुलभ व सोपी सुटसुटीत असल्याने सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व आपले पोट खराब असलेले क्षेत्र हे लागवडीखाली किंवा लागवड योग्य क्षेत्रात समाविष्ट करून घ्यावे. असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी श्री.जल्लोष शर्मा धुळे व श्रीमती तृप्ती धोडमिसे उपविभागीय अधिकारी धुळे आणि श्री प्रवीण चव्हाण के. तहसीलदार साक्री यांनी जिल्यातील शेतकऱ्यांना केले आहे

AVB माझा न्युज चॅनल सह
*चंद्रशेखर अहिरराव धुळे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध