Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ मे, २०२२

नंदुरबार रेल्वे स्थानकावर नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार डॉ.हीनाताई विजयकुमारजी गावित यांच्या प्रयत्नाने रा.खताचे रॅक पॉईंट सुरू करण्यात आले असून आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज दिनांक ०७/०५/२०२२ वार शनिवार रोजी उदघाटन करण्यात आले



आमदार डॉ विजयकुमार गावित म्हणाले, नंदुरबार रेल्वे स्थानकावर रेल्वे रॅक पॉईंट येण्यासाठी खासदार डॉ हीनाताई गावित यांनी पाठपुरावा केला.आज या रॅक पॉईंटमुळे शेतकरी बांधवाना खत मिळण्यास सोयीचे होणार असून स्थानिकांना रोजगार देखील मिळणार
आहे.खत,रासायनिक खते देखील याच रॅक पॉईंटवर येणार आहे.

त्यामुळे वाहतूकीचा खर्च वाचून वेळही वाचणार आहे.यापूर्वी दोंडाईचा येथे रॅक पॉइंट होता,खा.डॉ.हीनाताई गावित यांनी सातत्याने केलेल्या पाठपुरावाला यश आल्याने रॅक पॉइंटला नंदुरबार येथे मंजुरी मिळाली असून व्यापाऱ्यांनी खासदार डॉ हिनाताई गावित यांचे विशेष आभार मानले.यावेळी आरसीएफचे मार्केटींग ऑफीसर संदीप शिरसाठ,भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील,रेल्वे सल्लगार समिती सदस्य जवाहरलाल जैन,मोहन खानवानी,गोपी उत्तमानी,भरत माळी,दुर्गेश राठोड,सुभाष पानपाटील नगरसेवक आनंद माळी,लक्ष्मण माळी,संतोष वसईकर,एकनाथ पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.आरसीएफचे अधिकारी संदीप शिरसाठ यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी शहरातील व्यापारी देखील उपस्थित होते. रेल्वे रॅकमुळे आमचा वेळ वाचेल,असे व्यापा-यांनी सांगितले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

1 टिप्पणी:

  1. राजकीय लोकांना शुभारंभ करण्यात तेव्हढी घाई असते श्रेय घेतात परंतु rek point वर वाहतूक सुविधा साठी हमाल आणि इतर गोदाम व्यवस्था सध्या तरी एकाधिकार सारखी राजकीय लोकांचे हातात असल्यामुळे फारच महाग करूनंथेवतात सेवा त्यामुळे खत असो की अन्नधान्य ठेकेदार हे संगनमत करून सर्वसामान्य जनतेचे वेठीस धरून त्यांचे फायदेचे तेवढेच काम करतात अती दुर्गम भागात तोटा होतो त्या ठिकाणी सेवा देत नाहीत ठेकेदार आणि खऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून ही हा प्रश्न आहे तसाच आहे पूर्वी सहकारी संस्था राजकीय नेते सामाजिक आर्थिक चलन साठी उपयुक्त होत्या परंतु सध्य परिस्थीत व्यापारी सहकारी संस्था मध्ये गेले मुळे सहकार चळवळ भ्रष्टाचार नसून ही बदनाम झाल्या अनियमित पना आणि शासकीय धोरण उदारीकरण असो की खाजगीकरण याचा फायदा ठराविक लोक घेताना दिसत आहेत पूर्वी भागीदार असायचे आता मालकी हक्क ने स्वतः चे हीत साधत व्यापारी स्वतः ची प्रगती करत आहेत पूर्वी सहकारी संस्था फायदा लोक समूह साठी स्थावर मालमत्तेत असायचा त्याचा फायदा सार्वजनिक काम साठी होत होता आता मात्र राजकीय नेते हिप्रथम पक्ष निधी नंतर सामाजिक काम करताना दिसत आहे त्यामुळे भारतीय व्यवस्था खील खीली झाली आहे

    उत्तर द्याहटवा

प्रसिद्ध