Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ मे, २०२२

शिंदखेडा तालुक्यातील रामी येथील एका शेतकऱ्यासह तीघांची ५१ हजारांची फसवणूक स्टेट बँक ऑफ इंडीया दोंडाईचा शाखेच्या ग्राहकसेवा केंद्रातील दोघांनी ही फसवणूक केल्याची घटना



शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील रामी येथील एका शेतकऱ्यासह तीघांची ५१ हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.स्टेट बँक ऑफ इंडीया दोंडाईचा शाखेच्या ग्राहकसेवा केंद्रातील दोघांनी ही फसवणूक केली आहे.याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात एका तरुणासह महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात,रामी ता.शिंदखेडा गावातील शेतकरी कौतिक हरी माळी यांनी दोंडाईचा पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,त्यांनी दि.३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दोंडाईचा शहरातील देना बँक समोरील ग्राहक सेवा केंद्रातील किरणकुमार हरिश्चंद्र पवार रा . टोणगावकर हॉस्पिटल जवळील वस्ती दोंडाईचा व शितल अनिलगीर गोसावी रा . नंदुरबार चौफुली दोंडाईचा या दोघांकडे त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडीयाचे दोंडाईचा शाखेतील बचत खात्यात ७ हजार रूपये जमा केले होते.

परंतू आठ दिवसांनी कौतीक माळी हे बँकेत पासबुक भरण्यासाठी गेले असता त्यांचे खात्यात ७ हजार रुपये जमा झालेले नाही,असे त्यांच्या निदर्शनास आले.याच पध्दतीने नंदु रामदास त्यांच्या निदर्शनास आले.याच पध्दतीने नंदु रामदास गिरासे यांनी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी दिलेले १४ हजार रुपये वरील दोघांनी संगनमत करून बँकेत जमा न करता स्वतःकडे ठेवून घेतले.याशिवाय सुनिता दादाभाई राजपूत यांच्या बँक खात्यात जमा असलेले ४२ हजार काढून घेतले व त्यांना केवळ १२ हजार परत केले.उर्वरीत ३० हजार रुपये स्वतःकडे ठेवून घेतले.अशाप्रकारे किरणकुमार पवार व शितल गोसावी या दोघांनी मिळून तिघांची एकूण ५१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.त्यानुसार किरणकुमार व शितल या दोघांविरुध्द भादंवि कलम ४२०,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध