Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ मे, २०२२

शिरपुर शहरात राॅयल फाउंडेशन तर्फे धुळे व नंदुरबार जिल्हा स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा '२ री राजवीर श्री '२०२२ चा मानकरी धुळयाचा उदयराज जाधव..!



शिरपूर प्रतिनिधी:शिरपुर शहरात राॅयल फाउंडेशन तर्फे धुळे व नंदुरबार जिल्हा स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा '२ री राजवीर श्री '२०२२ घेण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष- श्री. रोनकसिंग राजपूत (मुंबई ) उपाध्यक्ष-श्री. गजेंद्र सिंग राजपूत (दै.राष्ट्उदय शिरपूर ) सचिव-श्री.भगवानसिंग जमादार हे होते तर बेस्ट पोझर म्हणून मिस्टर इंडिया, युनिव्हर्स खेळाडू म्हणून हरपालसिंग राजपूत उपस्थित होते.

प्रथम बाहुबली हनुमान यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन,स्पर्धा सुरू करण्यात आली.स्पर्धेत प्रथम ६० किलो वजन गटाची स्पर्धा घेण्यात आली.त्या नंतर चिं.राजवीर यांचा वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस मनवण्यात आला.त्या नंतर स्पर्धेला पुढील गटानुसार सुरुवात करण्यात आली ५ + १ (अपंग)असे एकूण ६ गटात स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत एकूण ५५ खेळाडूंचा समावेश होता .६० किलो वजन गटात -प्रथम -१) उदयराज जाधव(धुळे) ,द्वितीय-२)जयवंत सोनवणे (धुळे)तिसरा-३) अश्विन नायर (शिरपूर) तर ६५ किलो वजन गटात प्रथम-१)दुर्गेश राजपूत शिरपूर) द्वितीय -२)अरुण भोई(शिरपूर)३) दिनेश भावे (नंदुरबार) पुढे ७० किलो वजन गटात प्रथम-१) ऋषिकेश चव्हाण (धुळे)२) रोशन गांधी (धुळे)३) विशाल पाटील (शिरपूर) पुढे ७५ किलो वजन गटात प्रथम -१) सुनिल आव्हाड (शहादा)२) राजेंद्र पवार (शिरपूर) ३) प्रेमराज कोळी(शिरपूर) व अपंग गटात प्रथम-१)मोहन (प्यारे मोहन ) ईशी, (शिरपूर) द्वितीय २) रोशन गांधी (धुळे ) आशा पध्दतीने स्पर्धा घेऊन प्रथम क्रमांक पटकावलेल्या सहा खेळाडूं मधून मानाच्या २ री राजवीर श्री २०२२' चा मानकरी शोधण्याची स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत धुळे येथील ६० किलो वजन गटातील उदयराज जाधव हा मानाच्या ' २ री राजवीर श्री २०२२ ' चा किताब विजेता ठरला.त्याला मानाचा‌ किताब देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणारे मान्यवर वसिम.पठाण (शिरपूर) भरत राठोळ (फि्डम फाॅर फाॅशन शिरपूर ) ललीत पाटील (पोलिस स्टेशन शिरपूर) अश्विन कुमार पटेल (राॅयल जिम शहादा ) भूपेंद्र राजपूत (अंबिका मोबाइल शाॅप शिरपूर ) कन्हैयालाल पवार व विशाल राजपूत (मेवाड रत्न अमुततुल्य चहा शिरपूर ) विनायक भाऊ कोळी (सामाजिक कार्यकर्तै शिरपूर ) निलेश गरुड (सामाजिक कार्यकर्ते शिरपूर) कैलास सिंग राजपूत (सामाजिक कार्यकर्ते शिरपूर ) भोजूसिंग राजपूत (शिरपूर) धनंजय भाऊ(किंग पार्क शिरपूर) ‌भूपेश मराठे सुमित तिवारी अमरदिप गिरासे ( राॅयल प्रोटीन शाॅप शिरपूर ) सुशांत राजपूत (एस.आर.फोटो ग्राफी शिरपूर) ‌दिपक भाऊ (चामुंडा डेकोरेशन शिरपूर )आदि मान्यवरांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध