Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ मे, २०२२

शिरपूर कॉटेज उपजिल्हा रुग्णालयातून गोरगरीब रुग्णांना पुरेपूर व दर्जेदार सेवा मिळावी धुळे जिल्हा लालबावटा शेतमजूर युनियनची मागणी..!



शिरपूर प्रतिनिधी: धुळे जिल्हा लालबावटा शेतमजूर युनियन मार्फत दिनांक 20 /5/2022 रोजी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाघ साहेब यांना रुग्णालयातील विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,शिरपूर तालुका आदिवासी प्रवण तालुका असल्यामुळे गोर गरीब शेतमजूर लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ‌

आपल्या उपजिल्हा रुग्णालयात दर्जेदार व पुरेशी सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांना खाजगी दवाखान्यात किंवा इंदिरा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये पैसे देऊन उपचार घ्यावे लागतात. महागाईमुळे गोरगरीब रुग्णांना आरोग्यसेवा परवडत नाही आपले दवाखान्यात रुग्णांना पुरेशी सुविधा अभावी जिल्हा सरकारी रुग्णालयात किंवा खाजगी दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला दिला जातो,आपले रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे केंद्र शासनाच्या इंडियन पब्लिक हेल्थ स्टॅंडर्ड प्रमाणे दवाखान्यात सर्व सुविधा मिळणे आवश्यक आहे ‌परंतु सुविधांअभावी गोरगरीब रुग्णांना शासकीय सुविधा पासून वंचित राहावे लागते म्हणून हे निवेदन भाग देणे भाग झाले आहे ‌

रुग्णालयात आवश्यक डॉक्टर,कर्मचारी, औषध साठा,वैद्यकीय मशिनरी यांची कमी असल्यास शासनाकडे मागणी करण्यात यावी,गोरगरीब रुग्णांना पुरेपूर व दर्जेदार सेवा मिळावी,अशी मागणी लालबावटा शेतमजूर युनियन मार्फत करण्यात आले आहे

निवेदनावर धुळे जिल्हा शेतमजूर युनियनचे अध्यक्ष एडवोकेट कॉम्रेड संतोष पाटील,धुळे जिल्हा भाकप सेक्रेटरी एडवोकेट हिरालाल परदेशी,धुळे जिल्हा किसान सभा अध्यक्ष डॉक्टर कॉम्रेड किशोर सूर्यवंशी,जिल्हा सल्लागार अडवोकेट मदन परदेशी,किसान सभेचे कॉम्रेड अर्जुन कोळी,युनियनचे उपाध्यक्ष कॉम्रेड भरत सोनार आदींच्या सह्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध