Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २२ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
पांझरा कान साखर कारखाना हा कुठल्याही परिस्थितीत सुरू करावा या उद्देशाने सर्वपक्षीय मेळावा साक्रीत संपन्न!
पांझरा कान साखर कारखाना हा कुठल्याही परिस्थितीत सुरू करावा या उद्देशाने सर्वपक्षीय मेळावा साक्रीत संपन्न!
पांझरा कान सहकारी साखर कारखाना पुनरुज्जीवित करावा या मागणीसाठी आज साक्री येथे बाल आनंद नगरी सभाग्रहात शेतकरी कामगारांचा भव्य मेळावा संपन्न झाला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तुळशीराम गावित हे होते.मेळाव्यात कारखाना आहे तेथे चालवावा भाडेपट्टे धारकाने भाडे पट्ट्याच्या सरकारच्या धोरणा प्रमाणे करार करून तो चालू करावा.सध्या ज्याला देकार मिळाला आहे त्या पवन मोरे यांच्या स्पर्श शुगर उद्योगाने 30 मे पर्यंत बँकेशी करार करावा. व अटी शर्तीनुसार कारखांना लवकरात लवकर सुरू करावा.कुठलीही मालमत्ता त्यांनी भंगारात विक्री करू नये. त्याने तीस मे या तारखेपर्यंत करार न केल्यास कारखाना सुरू करण्याच्या संबंधातला सकारात्मक हालचाली न केल्यास दुसऱ्या सक्षम यंत्रणेमार्फत कारखाना चालविण्याचा सर्व पक्ष व सलग्न संघटना मार्फत प्रयत्न केला जाईल कारखाना भाडेपट्ट्याने चालविण्याच्या भूमिकेबाबत बँकेचा व्यवहार व भाडेपट्टे धारकाची वाटचाल यावर देखरेख सूचना करणे व चर्चा विनिमय करून निर्णय घेणे याकरता एका समितीची निवड करण्याचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला. पवन मोरेचे प्रतिनिधी म्हणून त्यांची बाजू ही श्री.धनंजय अहिरराव (उप सरपंच भांडणे) यांनी स्पष्टपणे मांडली त्यानंतर इतर विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी यांनीही आप आपले विचार या विषयावर मांडले यात मुख्यत्वे खलील मान्यवर उपस्थित होते.
त्यात पंकज मराठे शिवसेना उत्तमराव देसले भानुदास गांगुर्डे (काँग्रेस )नरेंद्र मराठे सुरेश आण्णा सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस )संजय अहिरराव,मोहन सूर्यवंशी( भाजपा) शशिकांत भदाने,भास्कर काकुस्ते( शेतकरी संघटना) साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे चिटणीस गजेंद्र भोसले,यांची सविस्तर भाषणे झाली. मेळाव्यास साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष परागजी बेडसे हे हजर होते.शेवटी अध्यक्षांचे भाषण होऊन मेळाव्याची सांगता झाली.मेळाव्याची
प्रस्तावना,व ठरावांचे वाचन सुभाष काकुस्ते यांनी केले.अशोक भामरे यांनीही मनोगत व्यक्त केले. याशिवाय धनंजय अहिरराव यांनी पवन मोरे यांच्यावतीने पवन मोरे ३०मे पर्यंत करार करेल व कारखाना चालवेल.असे सांगितले. मेळाव्याचे सूत्रसंचालन नरेंद्र तोरवणे यांनी केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा