Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १३ मे, २०२२

स्वच्छ व सुंदर शहर पुरस्कार मिळवणारी न.पा.हिच काय ? वाल्मीक नगर परिसरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता!



तरुण गर्जना वृत्तसेवा शिरपूर प्रतिनिधी शिरपूर : सुंदर शहर स्वच्छ शहर असे ब्रिदवाक्य देत शिरपूर नगरपरिषद ही महाराष्ट्रात नव्हे देशात नावलौकीक मिळवत अनेक बक्षिस प्राप्त झालेले असतांना शिरपूर शहरातील जवळ जवळ संपूर्ण भागात भुयारी गटार बनविल्याचा दिंडोरा पिटण्यात आला मात्र वाल्मीक नगर व हुडको,किस्मत नगर येथील मध्य भागी असलेली भुयारी गटारीत प्रचंड प्रमाणात घाण साचून घाण मैला साचलेला आहे.ही बाब शिरपूर शहराच्या लौकीकास शोभणारी नाही.याबाबत या परिसरातील स्थानिक रहिवाश्यांच्या वतीने संतोष भोई व विनायक कोळी यांनी शि.व.न.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ६ एप्रिल रोजी निवेदन सादर केलेले आहे. 

याबाबत निवेदन देण्या आगोदर या परिसरातील रहिवासी यांनी मा.भुपेशभाई पटेल यांची भेट घेवून ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता लवकरच भुयारी गटार लागून असलेली दुसरी गटार कायमची बंद करण्यात येईल.असे आश्वासन दिले.मात्र अजून देखील या कामास सुरवात झालेली नाही या उघडचा गटारीमध्ये आजूबाजूच्या परिसरातील नागरीक सर्व प्रकारचा घाण व कचरा या ठिकाणी उकिरडा समजून टाकत असतात. त्या मुळे हा सडलेला कचरा परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरवत आहे.

चालूच आलेल्या कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगापासून जेमतेम शिरपूर शहर कोरोना मुक्त झालेले आहे.यातच अश्या प्रकारच्या घाणीमुळे मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झाली असून स्थानिक नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.सध्या उन्हाळ्याच्या दिवसात बरेसचे नागरिक उष्णतेमुळे बाहेर खाट टाकून झोपतात पण या डासांमुळे त्यांना रात्रभर झोप लागत नसल्याने त्यांची मानसिकता बदलत असल्याचे त्यांच्या चिडचिडपणातून चित्र दिसत आहे. 

यामुळे आपोआप काही नागरिकांचा घरात गृहक्लेष देखील होत असल्याचे दिसून आले आहे.यास केवळ परिसरात असलेले घाणीचे साम्राज्य कारणीभूत आहे.आणि अश्यातच अजून दुसरे साथीचे रोग पसरु नये यासाठी स्थानिक रहिवाश्यांचा प्रयत्न आहे.तरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देवून जातीने काम करून घ्यावे असे येथील रहिवाश्यांचे म्हणणे आहे.भविष्यात या ठिकाणी कोणताही साथीचे रोग निर्माण झाल्यास त्यास नगरपरिषदेस जबाबदार धरण्यात येईल असे मत परिसरातील रहिवाश्यांनी व्यक्त केले आहे.

आणि यासाठी या त्रस्त नागरिकांच्या वतीने संतोष भोई व विनायक कोळी यांनी शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे परिसरातील तमाम रहिवाश्यांच्या सह्यानिशी निवेदन सादर केलेले आहे . तरी नगरपरिषदेने लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी अपेक्षा वाल्मिक नगर वासियांची आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध