Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे आता तरी कार्यवाही होईल का ? मा.गट विकास अधिकारी पंचायत समिती साक्री व विस्तार अधिकारी व ग्रामसेवकावर कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल होईल का ?
साक्री मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे आता तरी कार्यवाही होईल का ? मा.गट विकास अधिकारी पंचायत समिती साक्री व विस्तार अधिकारी व ग्रामसेवकावर कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल होईल का ?
साक्री तालुक्यातील धाडणे गावातील महिला तक्रारदार
सौ.मंगलबाई केदार घरटे रा.धाडणे ता साक्री जिल्हा धुळे यांच्या खाजगी मौजे धाडणे (महसूल) गट नं.757/3/ब/2 मध्ये ग्रामपंचायती अंतर्गत घरकुलांची अतिक्रमण झालेले आहे जिल्हाधिकारी धुळे, तहसीलदार साक्री, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती साक्री व ग्रामपंचायत धाडणे मार्फत चौकशी सुद्धा झालेली आहे तसेच , चौकशी अहवाल प्राप्त झाला असून तरीसुद्धा अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ करत आहेत गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत धाडणे यांना आवश्यक कागदपत्रे पुरवली आहेत सदर तक्रारदार यांची दिवाणी न्यायालय यांच्या आदेशा ने भुमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी सुद्धा झालेली आहे तरीसुद्धा पंचायत समिती ला व ग्रामपंचायतीला सर्व पाठपुरावा करून सुद्धा ग्रामपंचायत व पंचायत समिती साक्री यांनी अतिक्रमावर योग्य कारवाई अद्याप केलेली नाही लवकरात लवकर अतिक्रमण खाली करून द्यावे अशी मागणी तक्रारदार यांचेकडून होत आहे गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी व ग्रामविकास अधिकारी मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे व त्यांनी अतिक्रमण झाल्याचा अहवाल देखील दिलेला आहे परंतु पुढील कारवाई अजूनही होत नाही सदर पंचायत समिती साक्री व ग्रामपंचायत धाडणे यांना ,वेळोवेळी अर्ज स्मरणपत्रे दिली आहेत , परंतु प्रकरणाला 11 महिने झाली असून अद्याप योग्य कारवाई झाली नाही संबंधित कार्यालयांमध्ये सर्व पुरावे जमा केली आहेत खाजगी गट नंबर मध्ये घरकुल विना परवानगी. अतिक्रमण करून बांधकाम झालेले आहे सदर त्या जागेस संबंधीची कागदपत्रे ग्रामपंचायत मध्येेे नाहीत असे चौकशी अहवालामध्ये दिलेले आहेत मग घरकुले बांधली कशी? मंजूर कशी झाली? शाखा अभियंत्याने फोटो अपलोड कसे केले? पैसा कोणत्या प्रकारे लाभार्थ्याला दिला गेला ? कोणत्या कागदपत्राच्या आधारे घरकुल मंजूर झाली ? सदर जमीन मालकाची परवानगी नसताना गट नंबर मध्ये ग्रामपंचायतीने घरकुल बांधीत कशी? जिओ टेग फोटो मध्ये माजी उपसरपंच कस काय आला ? उपसरपंचांनी लाभार्थ्याच्या जागेवर उभे राहून फोटो कसे काढले ? माजी उपसरपंच यांचा सासरा व साला अतिक्रमण धारक असून त्यामुळे तर अतिक्रमण धारकांवर कारवाई होत नाही ना ? गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता (इंजिनियर), ग्राम विकास अधिकारी यांनी जागेची व कागदपत्रांची पडताळणी करून पाहिली नाही का ? केंद्र आणि राज्य शासनाच्या पैशाची अयोग्य प्रकारे विल्हेवाट लावली असून या जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण होतो या सर्व गोष्टी पडताळून पाहणी करण्याच्या आवश्यक असताना गटविकास अधिकारी हे विस्तार अधिकारी , ग्रामसेवक यांचे पाठ राखन करत आहे हे निदर्शनास दिसुन येत आहे म्हणून विस्ताराधिकारी व ग्रामसेवक मस्त तक्रारदार त्रस्त आहे.ग्राम विकास अधिकारी यांनी लक्ष का दिले नाही ? त्यांनी दिले नाही तर विस्तार अधिकारी यांनी काय केले ?असा प्रश्न निर्माण होतो गटविकास अधिकारी पंचायत समिती साक्री व ग्रामपंचायत धाडणे ग्रामविकास अधिकारी यांना व प्रत्यक्ष भेट घेेऊन अतिक्रमण सबंधीतची सर्व माहिती दिलेली आहे अतिक्रमण स्पष्ट असताना कारवाई का झाली नाही? जिल्हाधिकारी धुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक, तहसीलदार साक्री यांच्याकडून अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी गटविकास अधिकारी यांना देखील पत्र दिले गेले आहे सदर गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्राम विकास अधिकारी हे वरिष्ठ यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असून मग न्याय मिळायची अपेक्षा कोणाकडून करायची असा प्रश्न उपस्थित होतो सदर प्रकरणाची शासन दरबारी नोंद घ्यावी व लवकर न्याय द्यावा अशी मागणी तक्रारदार यांच्याकडून होत आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर येथे एका तरुणाने 'लिव्ह-इन' रिलेशनशिपमध्ये असलेल्या युवतीसोबतचे नाते तुटल्यामुळे संतापातून तिचे आक्षेपार्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा