Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ मे, २०२२

संत शिरोमणी श्री भीमा भोई जयंती निमित्ताने शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावात भोई समाज सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वाघाडी शाखेचे फलक अनावरण व पाहुण्यांनी वाघाडी गावातील ग्रामस्थांना मार्गदर्शन



शिरपूर प्रतिनिधी: दिनांक 25 मे रोजी संत शिरोमणी श्री भीमा भोई जयंती निमित्ताने शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावात भोई समाज सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वाघाडी शाखेचे फलक अनावरण व पाहुण्यांनी वाघाडी गावातील ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.


मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी भविष्यात तरुणांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्याची गरज सांगून सदर मेळावा पुढच्या महिन्यात नियोजित आहे..
समाजाचे देणे लागते या अर्थाने सर्व समाज बांधवांनी एकमेकांना सहकार्य करावे व गावातील सुभाष नगर चे सरपंच विजय भाऊ पवार यांनी देखील भोई समाजासाठी जे काय करता येईल ते मी शंभर टक्के करेल असेदेखील त्यांनी या कार्यक्रमात विचार मांडले तसेच तसेच भोई समाज सेनेचे संस्थापक अध्यक्ष भिलेश भाऊ खेडकर यांनीदेखील समाजावर कुठल्याही प्रकारचे अन्याय होऊ नये यासाठी व समाजाचे कुठलेही काही अडचण आल्यास बिनधास्त आमचे सहकाऱ्यांना फोन करा असेदेखील आव्हान केले व वाघाडी गावाची तंटामुक्ती अध्यक्ष श्रीराम माळी यांनीदेखील समाजाविषयी खूप सुंदर मनोगत व्यक्त केले होतेयावर विचार मांडले.यावेळी भोई समाज सेनेचे शिरपूर शहर अध्यक्ष पद डॉ. किशोर ढोले यांना देण्यात आले.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोई समाज सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष  पुनमचंद मोरे यांना केले.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भोई समाज सेनेचे संस्थापक-अध्यक्ष भिलेशभाऊ, खेडकर,भोई समाज सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष पुनमचंद मोरे,भोई समाज सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मनोहर भाऊ फुलपगारे, जिल्हाध्यक्ष विरेंद्रभाऊ फुलपगारे,
ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशितोष वाडीले,
जिल्हा उपाध्यक्ष निलेश फुलपगारे  व वाघाडी गावाच्या सरपंच उज्वला ताई पाटील, सुभाष नगर चे सरपंच विजय भाऊ पवार, वाघाडी गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष श्रीराम आण्णा माळी, भोई समाज आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सीएम भोई सर, भाईदास मोरे सर, गुलाब भोई, मनोज ढोले उपस्थित होते. 


यावेळी गावातील उपस्थित नागरिक व भोई समाज बांधव ईश्वर मोरे,जगन्नाथ ढोले,देवचंद मोरे,दिलीप मोरे,साहेबराव मोरे,शिवराम ढोले,गुलाब मोरे,परशुराम ढोले,राजेंद्र मोरे,विनोद मोरे,सुरेश ढोले, मधुकर मोरे,जीवन मोरे,रमेश वाडीले,रमेश मोरे,सुनील मोरे,विकी मोरे,प्रशांत मोरे, प्रशांत मोरे,ज्ञानेश्वर मोरे,विशाल मोरे, विनोद कोळी,मयूर कोळी,कुंदन पाटील, कुलदीप मोरे,मच्छिंद्र ढोले,सुनील ढोले, अनिल ढोले,अजय मोरे,हर्षल पाटील, अजय सोनवणे यांनी अनमोल सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.व आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध