Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मे, २०२२

धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात बियाणे आणि खतांचा काळाबाजार होऊन नाही कृषी विभागाने स्वतंत्र कक्ष सुरू तक्रारींची त्वरित दखल



धुळे प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात बियाणे आणि खतांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांना फटका बसू नये यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.या कक्षात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून तक्रारींची त्वरित दखल घेऊन कार्यवाही होणार आहे.

याद्वारे कृषी निविष्ठांच्या व्यवहारावर नियंत्रण,खरीप हंगामात बियाणे,खते व कीटकनाशकांबाबत शेतकरी कंपनी प्रतिनिधी,बियाणे,खते व कीटकनाशके विक्रेत्यांना क्षेत्रीयस्तरावर निर्माण होणाऱ्या अडचणींचे निराकरण व्हावे.तसेच बियाणे,खते व कीटकनाशकांचे उत्पादन,प्रक्रिया,वाहतूक,वितरण व विक्री करताना अडचणी निर्माण होऊ नये.निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी उत्पादन,वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे . यापार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.हा कक्ष रोज सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत सुरू राहील अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध