Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० मे, २०२२

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका क्लिप मुळे चौदा वर्षापूर्वी बेपत्ता झालेले सुनिल भोई हे घरी परतले !



जळगाव प्रतिनिधी:सुनील भोई हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे राहणारे.अशिक्षित आणि गतीमंद असणारे भोई २००८ साली अचानक गायब झाले.त्यात ते अशिक्षित आणि गतीमंद असल्याने कुटुंबियांना खुपच काळजी लागून राहिली.त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांचीही मदत घेतली पण त्यांचा काहीच शोध लागू शकला नाही. पण अचानक काही दिवसांपूर्वी भोईंच्या कुटुंबियांच्या पाहण्यात एक व्हिडिओ क्लिप आली.त्यामध्ये सुनील भोई हे तामीळनाळूत असल्याचे त्यांना कळून आले.त्या क्लिपच्या आधारे भोई कुटुंबाने थेट तामीळनाडू गाठले आणि ते सुनील भोईंपर्यंत पोचले.त्यांना विमानाने जळगावला आणण्यात आले.पाचोऱ्यात पोचल्यावर तर सुनील भोईची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूकच काढण्यात आली.कुटुंबियांच्या या आनंदात सगळे पाचोरावासीयदेखील सामील झाले होते.

१४ वर्षापूर्वी रेल्वेत बसून सुनील भोई थेट तामीळनाडूत पोचले होते.तेथली तामीळ भाषा त्यांना येईना आणि तिथल्या लोकांना मराठी कळेना.अखेर त्यांनी तिथेच रस्त्यावर जगणे सुरु केले. यवतमाळ येथील अभियंता अमोल गव्हाणे हे कामानिमित्ताने तामिळनाडू येथे गेले होते.त्यावेळी त्यांना भोई दिसले.भोई हे मराठीत बोलत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांच्याशी बोलल्यावर ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील असल्याची माहिती गव्हाण यांना मिळाली.अमोल गव्हाणे यांनी सुनील भोई यांची व्हिडिओ क्लिप तयार केली आणि जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या मित्रांना पाठवली. तीच क्लिप पाचोरा येथील सुनील भोईंच्या कुंटुंबियांपर्यंत पोचली आणि भोई आपल्या घरी परत पोचले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध