Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ मे, २०२२

थाळनेर पोलीसांची मोठी कारवाई ; राजस्थान येथून औरंगाबाद येथे कत्तलीसाठी जाणारे गुरे , ढोरे वाहनासह जप्त , गुन्हा दाखल



तरुण गर्जना वृत्तसेवा शिरपूर प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाणे हद्दीतून राजस्थान राज्यातून औरंगाबाद येथे शिरपूर चोपडा मार्गे गायी व गोह्यांना वेदना व याचना होतील अशा पध्दतीने आखूड दोराने बांधुन निर्दयतेने त्यांना वाहनात पुरेशी जागा नसतांना कोंबून भरून घेऊन जाणाऱ्या दोन लॅलेंड कंपनीच्या ६ चाकी ट्रक चालक व त्यांचे सहकार्याविरुद्ध ने पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.१० रोजी रात्री ११ वाजे पासून ते दि .११ रोजी पहाटे ०५:०० वाजेच्या दरम्यान मा.प्रविणकुमार पाटील , पोलीस अधीक्षक धुळे यांनी संपूर्ण धुळे जिल्हयांत नाकाबंदी करुन संशयीत आढळणाऱ्या चारचाकी,दुचाकी वाहनांची कसुन तपासणी करून कारवाई करणे कामी आदेश दिलेले होते. 

त्या अनुषंगाने थाळनेर पोस्टेचे प्रभारी अधिकारी उमेश बोरसे यांनी थाळनेर पोस्ट हद्दीत शिरपूर चोपडा रोडवरील चोपडा फाटा येथे कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी करून संशयीत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना दि . ११ रोजी रात्री १:४० वाजेच्या सुमारास ताडपत्रीने बांधलेले लॅलेंड कंपनीचे १२१४ मॉडेलचे ६ चाकी ट्रक क्रमांक आर.जे.५१ जी.ए. १५०३ व ट्रक क्र आर.जे .०६ जी.बी. ८८१३ ताडपत्रीने बांधलेले असे नाकाबंदी लावलेल्या ठिकाणी आले.वाहनांमधे काय माल भरलेला आहे 

बाबत दोन्ही वाहनांच्या चालकांकडेस चौकशी केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देवू लागल्याने पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी दोन्ही वाहनांच्या ताडपत्री उचकवून पाहणी केली असता , दोन्ही वाहनांमधे गायी गोह्यांना दाटीवाटीने, निर्यदयतेने एकमेकांना आखूड दोराने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने दोन्ही वाहनांना त्यांचे चालक व सहकाऱ्यांसह थाळनेर पोस्टेला आणून तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला . सदर कारवाईत २ ९ गायी व गोऱ्हे तसेच दोन्ही वाहनांसह एकुण २५,५४,००० / - रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून,गुरांना वाडी ता.शिरपूर येथील नवकार गोशाळेत पालन पोषण करीता दाखल करण्यात आलेले आहेत.लेलँड कंपनीचे १२१४ मॉडेलचे ६ चाकी ट्रक क्रमांक आर.जे. ५१ जी.ए .१५०३ वरील ट्रक चालक नाम ( १ ) सुब्हान इस्माईल शा वय - ४२ वर्षे व त्याचा सहकारी

सद्दाम हुसेन अजिज मोहम्मद वय २२ वर्षे तसेच ट्रक क्र.आर.जे .०६ जी.बी. ८८१३ वरील चालक ( ३ ) अय्युब शा.शकुर शा वय -३२ वर्षे तसेच त्याचा सहकारी ४ ) संपतराज कैलाशचंद भांबी वय - २१ वर्षे सर्व रा .गांव - कानिया ता. हुडा जि . भिलवाडा ( राजस्थान राज्य ) यांचे विरुध्द प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम सन १ ९ ६० चे कलम ११ चे ( घ ) , ( ड ) , ( च ) ,प्रमाणे थाळनेर पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

सदरची कारवाई ही मा.प्रविणकुमार पाटील,पोलीस अधीक्षक धुळे ,प्रशांत बच्छाव अपर पोलीस अधीक्षक धुळे,अनिल माने,उपविभागीय पोलीस अधिकारी ,शिरपूर विभाग शिरपूर तसेच हेमंत पाटील,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा धुळे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि - उमेश बोरसे व त्यांचे सहकारी पोहेकॉ / १०८६ शामसिंग वळवी,पोना / ०७ भुषण रामोळे , पोना / १३७४ प्रकाश मालचे,पोना / १३ रईस शेख,पोशि / १४५८ धनराज मालचे पोशि / ५७५ सिराज खाटीक अशांनी कारवाई केलेली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध