Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ मे, २०२२

साक्री तालुक्यातील इंदवे येथील वि.का.सोसायटीवर आबासाहेब पोपटरावजी सोनवणे यांची एक हाती सत्ता जिंकली



तालुका साक्री इंदवे येथील नानासाहेब उत्तमराव पाटील विकास सोसायटीची चुरशीच्या पंचवार्षिक निवडणूक 2022 आज दिनांक 26 रोजी पार पडली त्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते व साक्री तालुका मार्केट कमिटीचे सभापती आबासाहेब पोपटराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलचा झेंडा फडकला असून घवघवीत यश मिळाले आहे.

एकूण 13 जागांवर झालेल्या निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी तीन उमेदवार सहकार पॅनलचे बिनविरोध निवडून आले होते,तसेच दहा जागांवर होणाऱ्या मतदानामध्ये श्री पोपटराव सोनवणे यांचा सहकार पॅनलचे दहा जागांवरचे दहा उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली.व सोसायटीवर एक हाती सत्ता मिळवली. याबाबत लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मतदान केल्याबद्दल सर्व मतदारांचे श्री सोनवणे यांनी आभार मानले आहेत तसेच सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचा स्वागत व सत्कार केला त्यात निवडून येणारे उमेदवार श्री भगवान ओंकार जाधव,देवरे भरत शंकर,पाटील दिलीप गोरख,पाटील सिताराम भटा,भदाने सतीलाल युवराज,वाघ संदीप वसंत सोनवणे,दिलीप हिलाल सोनवणे, साहेबराव चिंतामण,देवरे जिजाबाई नाना,पाटील संगीता रमेश आधी उमेदवार निवडून आले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध