Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर भाजपा तर्फे संत श्री भिमा भोई जयंती साजरी..! महाराष्ट्र हि भूमी थोर संतांची : बबनराव चौधरी
शिरपूर भाजपा तर्फे संत श्री भिमा भोई जयंती साजरी..! महाराष्ट्र हि भूमी थोर संतांची : बबनराव चौधरी
शिरपूर प्रतिनिधी :भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्री भिमा भोई यांची जयंती निमित्त भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले. येथील भाजपा कार्यालयात दि. २५ मे रोजी संत श्री. भिमा भोई यांची जयंती भाजपा तर्फे साजरी करण्यात आली.यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी,भाजपाचे ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील,राजु टेलर,भाजपा मा. जिल्हा चिटणीस संजय आसापुरे,शहर सरचिटणीस महेंद्र पाटील,भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, अविनाश शिंपी, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी,पत्रकार मनोज भावसार,अमोल भोई,योगेश भोई, सचिन ठाकरे,गोलु भोई,विशाल पारधी, चिराग पवार, कुणाल पाटील, जयेश चौधरी सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले की,ऋषीमुनींच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीत विविध जाती-धर्माचे संत महंत जन्मास आले.तसेच महाराष्ट्र हि भूमी देखील थोर संतांची आहे. संतांच्या आचार,विचारातुन व प्रेरणेतून समाज कार्य होते.भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्री भीमा भोई यांनी भोई समाजात जन्म घेतला ते हि महाराष्ट्राचे थोर संत आहेत त्यांचा सामाजिक प्रबोधनाची परंपरा युवा पिढीने कायम राखावी असे त्यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर येथे एका तरुणाने 'लिव्ह-इन' रिलेशनशिपमध्ये असलेल्या युवतीसोबतचे नाते तुटल्यामुळे संतापातून तिचे आक्षेपार्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा