Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ मे, २०२२

कृषी सेवा केंद्र चालकांनी कोणत्या गोदामात किती खतसाठा ठेवला आहे याची माहिती कृषी विभागाला देणे बंधनकारक



प्रतिनिधी:कृषी सेवा केंद्र चालकांना बियाणे व खत साठ्याची माहिती कृषी विभागाला देणे बंधनकारक आहे.ही माहिती दिली नाही तर कारवाई करण्यात येईल,असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागासह शेतकऱ्यांनी तयारीला सुरुवात केली आहे.कृषी सेवा केंद्र चालकांनी खत,बियाण्यांची खरेदी सुरू केली आहे.

केंद्र चालकांनी कोणत्या गोदामात किती खतसाठा ठेवला आहे याची माहिती कृषी विभागाला देणे बंधनकारक आहे.

ही माहिती दिली नाही आणि कृषी विभागाने केलेल्या तपासणीत जास्तीचा साठा आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशारा तालुका कृषी अधिकारी अनिल निकम यांनी दिला आहे.शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करताना विक्रेत्याकडून बिलाची मागणी करावी.जबाबदारी कृषी सहायकावर तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते आहे का,विक्रेत्यांकडे खत किंवा बियाण्यांचा साठा किती आहे यावर कृषी सहायकांचे
लक्ष असेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध