Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ५ जून, २०२२
Home
/
Unlabelled
/
तेरेमे दम है तो मेरेको पकडके दिखा असे सांगून पोलिसाच्या छातीत बुक्का मारुन पिस्टल विक्रेता पळून जाण्याची घटना
तेरेमे दम है तो मेरेको पकडके दिखा असे सांगून पोलिसाच्या छातीत बुक्का मारुन पिस्टल विक्रेता पळून जाण्याची घटना
चोपडा प्रतिनिधी:असे सांगून पोलिसाच्या छातीत बुक्का मारुन पिस्टल विक्रेता पळून जाण्याची घटना 4 जुलै रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या दरम्यान चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत लासूर ते सत्रासेन दरम्यान घडली. दरोड्याच्या तयारीत असलेल्या व पकडण्यात आलेल्या आरोपींकडून गावठी बनावटीचे तीन पिस्टल,17 जिवंत काडतुस,एक मोटार सायकल व पाच मोबाईल हॅंडसेट असा एकुण 7 लाख 57 हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.पोलिस महासंचालकांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाई प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गु.र.न. 69/22 भा.द.वि. 399,402, 353,323,506 सह शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पो.हे.कॉ. मनोज दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.रविंद्र वसंत घारगे,जिजाबा मल्हारी फाळके,चांदपाशा अजिज शेख, जयेश लक्ष्मण भुरुक,शिकलकर (पुर्ण नाव माहिती नाही) व पळून गेलेला सतनामसिंग महारसिंग जुनेजा,अशा सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील पळून जाणा-या सतनामसिंग जुनेजा याने चौघांना पिस्टलची विक्री केली.तसेच शिकलकर नामक गुन्हेगार चौघांना दरोड्याकामी मदतीसाठी आलेला होता.
पोलिस महासंचालक पथकातील पो.नि. बापू रोहोम यांच्यासह स.पो.नि.सचिन जाधव,स.फौ.बशिर तडवी,हे.कॉ.रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर,शकील शेख, पोलिस नाईक मनोज दुसाने,कुणाल मराठे,प्रमोद मंडलीक,सुरेश टोंगारे तसेच चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. अवतारसिंग चव्हाण,पोलिस उप निरीक्षक अमरसिंग वसावे,हे.कॉ.राकेश पाटील, प्रमोद पारधी,पोलिस नाईक किरण धनगर, किरण पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा