बहुचर्चित व बहुप्रतीक्षेत असणाऱ्या अक्कलपाडा येथील जॅकवेलची व फिल्टर प्लांटची आज खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह मनपा सभापती व अधिकाऱ्यांनी कामकाजाची पाहणी करुन माहिती घेतली आहे. तसेच जॅकवेलचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होणार असून धुळेकरांना ग्रॅव्हिटी फोर्सने रोज पाणी दिले जाणार असल्याचे आश्वासन खासदार भामरे यांनी धुळेकरांना दिले आहे. तसेच या निमित्ताने फिल्टर प्लांटची देखील पाहणी करण्यात आली.
170 कोटी रुपयांची ही योजना असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही योजना मंजूर करण्यात आली होती. जो पर्यंत पाण्याची पातळी कमी होत नाही तो पर्यंत जॅकवेलचे काम करता येत नाही. आता पाण्याची पातळी कमी होऊन जॅकवेलच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच दिवाळीपर्यंत सदर प्रकल्प पूर्ण होणार असून धुळेकर यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिळणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुभाष भामरे यांनी केले आहे.
उन्हाळ्यात धुळेकर यांची झालेली पाण्यासाठी फरफट, पाण्याची बिघडलेली नियोजन त्यामुळे धुळेकर जनता त्रस्त झाली होती. त्याच अनुषंगाने धुळेकर यांची पाण्याची समस्या कायमची निकाली निघाली यासाठी जॅकवेलचे काम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले आहे.
याप्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, सभापती शितल नवले, माजी महापौर प्रदीप कर्पे, नगरसेवक सुनील बैसाणे, अभियंता चंद्रकांत उगले, एन के बागुल, राकेश कुले वार, यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा