Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २ जून, २०२२
साक्री तालुक्यातील शेणपूर गावात दलित वस्ती समाज मंदिराचे भूमिपूजन सोहळा साजरा
शेणपूर गावातील दलित वस्ती समाज मंदिराच भूमिपूजन कार्यक्रमाचा उद्घाटन प्रसंगी श्री राजाराम सहादू थोरात. या जेस्ट नागरिकांचा हस्ते नारळ वाढविण्यात आले. तसेच या प्रसंगी शेणपूर गावचे सरपंच, उप सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील,शेणपूर गावातील सर्व ग्रामस्थ,तरुण,महिला,दलित बांधव आदी मान्यवर उपस्थित होते.शेणपूर गावाच्या राजकारणाचा 40 वर्षाचा इतिहासात ज्या गोष्टीची नितांत गरज होती.व ती अनेक वर्षांपासून प्रलभीत होती.ज्याची गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून दलित बांधवांना ज्याची प्रतीक्षा होती.त्या दलित वस्तीतील विकास कामे गेल्या एक वर्षांपासून शासन स्तरावर मार्गी लागताना दिसत आहे.
या मध्ये आंबेडकर पुतळ्याचे सुशोभिकरण असो किंवा मिनरल वाटर प्लांट असो,स्ट्रेट लाइट,असो किंवा रमाई घरकुल योजना असो आशा अनेक शासकीय योजनांचा लाभ शासनस्तरा वरून या शेणपूर ग्रामपंचायत सत्ताधारींनी आपल्या गावासाठी आणले आहेत. आगामी काळात देखील गावासाठी भरभरून शासकीय योजना आपण आणणार असल्याचे प्रतिपादन शेणपूर ग्रामपंचायत प्रशासना कडुन यावेळी करण्यात आले.आणि आज त्यातीलच एक विकास कामाचा भूमिपूजन चा शुभ मुहूर्तावर दलित समाज मंदिर कामाचे उद्घाटन करण्यात येत आहे.शेणपूर गावात गेली अनेक वर्ष ग्रामपंचायतीत सत्तेत राहणारे ज्याचे नावाचा जिल्हा भरात नावलौकिक होते.असे आणासो, कै.विश्वासराव आनंदराव काकुस्ते हे शेणपूर गावचे तालुक्यातील एक प्रसिद्ध नाव होतं त्यांच्या राजकीय कारकीर्दीत गावातील दलित बांधवांचे त्यांना खूप मोठे योगदान आजवर राहिले आहे.
त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत.नेहमीच विश्वास राव अण्णांच्या समर्थनार्थ या दलित बांधवानी प्राणमणिक पाने व निष्ठेने त्यांचा सोबत खाद्याला खांद्या लावून काम केले आहे. हा इतिहास शेणपूर गावाने पहिला आहे.त्यांचे या परिवाराशी जुने ऋणानुबंध हे सर्व परिचित आहेत.आणि आजही या सर्व दलित बांधवांची,महिलांची तरुणांची त्यांचा परिवाराशी नाळ जुळलेले दिसून येते.आणि त्याचेच एक उदाहरण म्हणजे आता देखील सन 2021 मध्ये शेणपूर ग्रामपंचायत मध्ये त्याचा सुनेला याच तीन नंबर वार्ड मधून त्यांनी भरगोस मतांनी विजयी मिळून दिला आहे.
याची प्रचिती यातून दिसून येते. आणि आज ते स्वर्गवासी झाल्या नंतर देखील त्यांचा वंशजांनी हे ऋणानुबंध तसेच जोपासून ठेवले आहेत.आणि याचीच आठवण म्हणून कै.विश्वासराव आण्णा साहेब यांची सून सौ.निकिता आकाश काकुस्ते शेणपूर,ग्रामपंचायत सदस्य यांच्या स्व मालकीचा शेतातील गट क्रमांक 3 अ' यातून दलित समाज मंदिरासाठी ग्रामपंचायत कडे गावठाण ची जागा नसल्याने त्यांनी त्यांचा व्यक्तीगत स्वेच्छेने आणि विनामूल्य जागा देण्यासाठी शब्द दिला होता.आणि तो आज ते पूर्णत्वास आल्याची प्रचिती संपूर्ण गावकऱ्यांना येत आहे. गावातील अशा अनेक विकास कामाचा योजनांच्या लाभासाठी जिल्हा स्तरावर पाठपुरावा करणाऱ्या या ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी प्रयत्न करून आपल्या गावातील आदिवासी,
दलित, शाहू,अशा सर्वच वस्त्यांमध्ये विकास कामांचा एक सपाटा लावला आहे. त्यातच हे एक उदाहरण आपल्याला या माध्यमातून दिसून येते आहे.
या कार्यक्रमाचा प्रसंगी धुळे जि.प.सदस्य साहेबराव गागुर्डे.(शेवडीपाडा) यांच्या विशेष प्रयत्नातुन,हे काम केले अडल्याने दलित बांधवांनी त्यांचे अभिन्नदान केले तसेच गावातील,डॉ.सुरेश थोरात,धर्मा थोरात,जिभाउ थोरात,नंदकुमार काकूंस्ते,आकाश काकूंस्ते,चंद्रकांत काळे, सुनील काळे, हर्षल काकुस्ते, तुषार काकूंते,पंडित काळे,दामोदर पगारे,भास्कर काकूंस्ते,प्रभाकर पगारे,राकेश काकूंस्ते, किरण काकूंस्ते,राजेंद्र काकूंस्ते,प्रवीण काकूंस्ते,सनी पगारे,चंद्रशेखरअहिरराव,
पृथ्वीराज काकुस्ते,रामकुष्ण अहिरे,दत्तु देशमुख,राजेद्र शिंदे,प्रभाकर अहिरे, दीनेश सावळे,बापु नंदन,पंकज काकुस्ते ,रोशन बच्छाव,शिवदास थोरात,धुडकू थोरात,
साहेबराव थोरात,दीलिप थोरात,भैय्या थोरात,साहेबराव थोरात,बाबाजी थोरात,
भटु थोरात,संजय थोरात,दादाजी थोरात,
वसंत थोरात,आबास पिंजारी,शरीफ
पिजारी,ज्ञानेश्वर अहिरे,कार्यक्रमाचे सुत्र संचालन गणेश काकुस्ते यानी केले व आभार प्रदर्शन प्रा.शिक्षक संभाजी थोरात यांनी केले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा