Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ जून, २०२२

पिंपळनेरचे पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांनी अखेर पिंपळनेर परिसरातील सराइत चोरांना केले जेरबंद


पिंपळनेर –मा. पोलीस अधीक्षक सो.  प्रविणकुमार पाटील,धुळे यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकी दरम्यान तसेच वेळोवेळी घरफोडी/चोरी तसेच शेतकऱ्याचा शेतीमाला संदर्भात चोरी करणाऱ्या चोरांचा विशेष प्राधान्याने सर्वतोपरी शोध घेऊन मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिलेल्या होत्या.

पिंपळनेर पोलीस स्टेशनला सोयाबीन चोरी संदर्भात यापुर्वी गुरनं ५/२०२२, भा.दं.वि. कलम ३७९, गुरनं ४२ / २०२२, भा.दं.वि. कलम ३७९, गुन्हा रजि. नं. १३७ / २०२२ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. पिंपळनेर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १३७/२०२२ मधील तक्रारदार विजय देवीदास पेंढारकर, रा. माळी गल्ली, पिपळनेर यांचे धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय असून त्यांचे भाईदर गावचे शिवारात धान्य ठेवण्याचे पत्र्याचे शेड असलेले गोडाऊन आहे. सदर गोडाऊन मध्ये उघडयावर असलेला एकुण १,६२,००० /- रु.कि. २७ क्विटल सोयाबीन पिकाचा माल व ३०,०००/- रु.कि. ५ क्विटल वरई (भगर) कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे संमतीशिवाय चोरुन नेले होते त्याबाबत अज्ञात चोरटया विरुध्द त्यांनी दिलेल्या तक्रारी वरुन पिंपळनेर पोलीस स्टेशनला गुरनं १३७ /२०२२, भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोहेकौं / ११६९, पी.यु. सोनवणे हे सपोनि /सचिन साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

अशा प्रकारे सोयाबीन चोरी करणारे चोरटे ब-याच कालावधी पासुन पोलीसांना चकवा देऊन एकांतात असलेले धान्य गोडाऊन तसेच शेतकऱ्यांचा शेतात ठेवलेल्या गोडावुन/कांदा चाळ मधे ठेवलेल्या सोयाबीनची चोरी करीत होते. सदर गुन्हयाचा उलघडा करणेकामी सपोनि /सचिन साळुंखे यांनी अधिनस्त अंमलदार यांना सुचना देऊन तपासाची चक्र सर्व बाजुनी फिरवून तपास केला असता गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, इसम नामे रंजित योहान देसाई, वय २६ वर्ष रा. बोढरीपाडा, ता. साक्री हा आपले इतर साथीदार मार्फत सोयाबीन चोरी करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर त्यांस तात्काळ ताब्यात घेऊन विश्वासात घेवून विशेष कौशल्याने विचारपुस केली असता त्यांने गुन्हयाची कबुली देऊन त्यांचे सोबत असलेले ईतर साथीदार नामे २) रुवाजी गेंदा गावीत, वय ४५ वर्ष रा. बोढरीपाडा, ३) किरण इश्वर वळवी, वय २३ वर्ष रा. वासां, ता. साक्री, ४) दावित वन्या राऊत, वय २४ वर्ष रा. नांदरखी ता. साक्री अशानी मिळुन चोरी कली असल्याची कबुली देऊन वरील आरोपीत यांना नमुद गुन्हयात अटक करून त्यांचेकडुन त्यांनी बाजारात विकलेला एकुण ६५ क्विंटल सोयाबीन व ५ क्विटल वरई (भगर) असा एकुण ४,२०,०००/- रु. किं. मुद्देमाल हस्तगत करुन सोयाबीन चोरी करणारे अट्टल चोरटयाचे रॅकेट उघडकीस आणले असुन यापुर्वी देखील त्यांनी धुळे अगर नाशिक जिल्यात चोरीस गेलेल्या सोयाबीन बाबत तसेच इतर काही माला विरुध्दचे गुन्हे केले असल्याची शक्यता असल्याने त्यादिशेने पोलीस तपास चालू आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदिप मैराळे, पोलीस निरीक्षक/श्री हेमंत पाटील, स्था. गु.शा. धुळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक सचिन साळुंखे, असई / प्रविण अमृतकर, पोहेकाँ / प्रकाश सोनवणे, पोहेकॉ / मनोज शिरसाठ, पोशि/ राकेश बोरसे, पोशि/ भुषण वाघ अशांचा सहभाग आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध