Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १० जून, २०२२
Home
/
Unlabelled
/
पिंपळनेर पोलिसांची मोठी कारवाई गुरांनी भरलेला ट्रक पकडला, पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांचा विशेष पथकांची कारवाई
पिंपळनेर पोलिसांची मोठी कारवाई गुरांनी भरलेला ट्रक पकडला, पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांचा विशेष पथकांची कारवाई
पिंपळनेर – धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की सटाणा रोड वरून कत्तलीचा उद्देशाने गाय व गुरे घेऊन जाणारे वाहन जाणार आहे.
सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ सपोनि साळुंके यांनी एक पथक तयार करून पिंपळनेर ते सटाणा रोडवर शेलबारी घाटात सरकार हॉटेल च्या पुढे सापळा रचला व संशयित वाहनाच्या शोध सुरू ठेवला या वेळेस तेथे पिकअप वाहन क्रमांक एम एच o४ डी एस ९३९१ या वाहनाला थांबवून चौकशी केली असता ताडपत्री च्या आत त्यात गुरे दिसून आले त्यामुळे अधिक तपासासाठी सदरची गाडी पिंपळनेर पोलिस स्टेशनला आणून तिची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये कत्तलीचा उद्देशाने वाहून नेण्यासाठी ५ गोरे ३ गाय व १ काठीवाडी जातीचा बैल असे एकूण ९ गुरे किंमत रक्कम १.२१.००० रू व पिकप वाहन किंमत रुपये १.५०.००० रुपये असा एकूण २ लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पो काँ. भूषण ज्ञानेश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरून ड्रायव्हर शोएब अहमद शकील वय 27 रा. पवार वाडी फिरोजाबाद गल्ली मालेगाव जिल्हा नाशिक व अब्दुल अहमद खान वय 20 व्यवसायिक क्लिनर, हल्ली मुक्काम फार्मसी नगर प्लॉट नंबर 18 मालेगाव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पिंपळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलीस नाईक सी एस सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सूर्यवंशी यांच्या पथकाने केले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा