Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० जून, २०२२

शिवनपा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचाकडे मागणी धोबी समाज बहुल वस्तीला संत गाडगे महाराजांचे नाव द्यावे : धोबी समाज



शिरपूर : शहरातील वस्त्या गल्ल्या आणि मोहल्यांची जाती वाचक नावे बदलण्याचा आदेश डिसेंबर २०२० ला राज्याच्या समाज कल्याण विभागाने काढला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार शिरपूर शहरातील जवळपास ३५ वस्त्या,गल्ली आणि मोहल्यांची जातीवाचक नावे बदलली जाणार आहेत. या वस्त्यांची जाती वाचक नावे बदलण्या संदर्भात शिरपूर वरवाडे नगर परिषदेने नुकताच नवीन आदेश काढला आहे.शिरपूर वरवाडे नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी शहरातील ३५ वस्त्या आणि गल्ली मोहल्यांची जातीवाचक नावे बदलण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. 

धोबी समाज बहुल वस्तीला म्हणजेच पाटील वाडा परिसरातील धोबी गल्ली भागाला राष्ट्रीय संत श्री गाडगे बाबांचे नाव देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे,परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी यांचा नेतृत्वाखाली शिवनपा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना (दि ३० जुन ) रोजी शिरपूर परिट (धोबी) सेवा मंडळ तर्फे देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे. 

की,शिरपूर शहरातील विविध समाज बहुल वस्त्यांना त्या त्या समाजाच्या महापुरुषांचे नाव देण्याचा निर्णय शिरपूर नगर पालिका घेत आहे. मात्र धोबी समाज बहुल वस्तीला संत गाडगे महाराजांचे नाव न देता मेहतर कॉलनीला नाव दिल्याने धोबी समाज नाराज झाला आहे.मेहतर कॉलनीत धोबी समाजाचा एकही समाज बांधव राहत नाही.शहरातील धोबी समाज बांधव मोठ्या प्रमाणात पाटील वाडा परिसरात धोबी गल्लीत आहे. 


ज्याप्रमाणे इतर समाजाचे बहुतांश नागरीक राहत असलेल्या ठिकाणांना त्या त्या समाजाच्या महापुरुषांचे नाव देण्यात आले आहे त्याच निकषा प्रमाणे धोबी समाज बहुल वस्तीला म्हणजेच पाटील वाडा परिसरातील धोबी गल्ली भागाला राष्ट्रीय संत श्री गाडगे बाबांचे नाव देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन शिवनपा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना धोबी समाजाकडुन देण्यात आले आहे.

निवेदन देतेवेळी अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे,महा परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी,भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील,परिट (धोबी) सेवा मंडळ जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोरसे,शिरपूर परिट (धोबी) सेवा मंडळ तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, शिरपूर परिट (धोबी) सेवा मंडळ शहराध्यक्ष ज्ञानेश्वर ईशी, माजी शहराध्यक्ष अशोक बेडिस्कर,दिलीप चव्हाण, युवक जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र येशी,सुनिल सुर्यवंशी,लाॅड्री धारक जिल्हाध्यक्ष जितेंद्र बोरसे,प्रा.युवराज बेडिस्कर,शहर उपाध्यक्ष नरेश पवार, पत्रकार मोहन बोरसे,युवक माजी शहराध्यक्ष योगेश सैंदाणे,युवक शहराध्यक्ष हर्षवर्धन बोरसे, शहर उपाध्यक्ष अविनाश पवार,अनिल बोरसे,विनोद येशी,सागर जाधव आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध