Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १ जुलै, २०२२

पी एम किसान या मोजणी ची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करा:-साक्री ता. कृषी अधिकारी यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे निवेदन



अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. प्रदीप पाटील (बाबा) खंडापूरकर यांच्या आदेशाने तालुका साक्री येथील कृषी अधिकारी श्री. ठाकरे साहेब यांना निवेदन देण्यात आले. सन 2014 पासून पीएम किसान या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना शासनाकडून दरवर्षी 6 हजार रुपये याप्रमाणे अनुदान मिळत आहे. त्यासाठी शेतकरी बांधव हा प्रत्येक वर्षी के. वाय. सी. करून ऑनलाइन फॉर्म भरत असतो. व त्या माध्‍यमाने शेतकरी बांधवांच्या खात्यात केंद्र शासनाकडून वर्षाला 6 हजार रुपये मिळत आहेत. परंतु गेल्या 3-4 वर्षापासून शेतकरी बांधव ही आपली शेतीची कामे सोडून शहरातील ऑनलाइन सेंटर वर जाऊन के. वाय. सी. पूर्ण करून देखील काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या खात्यात कोणतीही रक्कम शासनाकडून जमा  होत नाही. गेल्या 3-4 वर्षापासून ही योजना अक्षरशः रेंगाळलेली दिसत आहे.
 तरी आपण या योजनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या योजनेपासून शेतकरी बांधवांना संजीवनी मिळालेली आहे. तरी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यावर सदर रक्कम जमा करावी व शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी श्री. प्रवीण दादा बोरसे (महाराष्ट्र प्रदेश संघटक), श्री. अनिल दादा देसले (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष), श्री. सचिन दत्तात्रेय नांद्रे (धुळे जिल्हा अध्यक्ष), श्री. नितीन दादा ठाकरे (साक्री तालुका अध्यक्ष) श्री. भैय्यासाहेब भीमराव पारधे (संघटक पिंपळनेर मंडल), श्री बापू ठाकरे (संघटक साक्री तालुका),श्री. निलेश दादा तोरवणे  यांच्या वतीने देण्यात आले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध