Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १५ जून, २०२२

शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे ,पालकांचे मोठ्या उत्साहात स्वागत* *मा.पंचायत समिती सदस्य माऊली देसले यांचा हस्ते विध्यार्थीना सायकल व शालेय साहित्य वाटप



श्री.सी.डी.देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयम्हसदी येथे विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.कार्यक्रम अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री.एस.ए.देवरे,प्रमुख पाहुणे श्री.राजधर देसले मा. पंचायत समिती सदस्य, साक्री उपस्थित होते.
पालकांचे व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून श्री.राजधर देसले यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पालक उपस्थित होते.श्री.जी आर देवरे यांनी कार्यक्रम रूपरेषा मांडली.प्रा.एस.व्ही. सुर्यवंशी यांनी 12 वी बोर्ड परीक्षेत कला, विज्ञान शाखेतील निकालाचे वाचन केले.जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.वैष्णवी विजय काकुळते हिला रोख 1000 रूव स्मृतीचिन्ह  प्रदान करण्यात आले. तृतीय क्रमांक कु. सोनाली शिंदे हिस 300 रूरोख व स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते बक्षिस प्रदान करण्यात आले.
मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप करण्यात आले.इ.8 वी इयत्तेतील 12 विद्यार्थ्यांनींना सायकली वाटप करण्यात आल्या.शाळा ते घर पाच कि.मी.अंतराचा निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनींना मोफत सायकल योजनेचा मानव विकास  मिशन  कडून लाभ देण्यात  आला.
  यावेळी प्राचार्य श्री.एस.ए देवरे ,श्री.एस.डी.देवरे,श्री.डी.पी.पाटील, श्री.एम.बी.भामरे, प्रा.सौ.यु.एस.देवरे, श्री.जी.आर.देवरे,श्री.एन.जी. पाटील, श्री.निलेश देवरे,श्री.बी.बी.बेडसे, श्री.व्ही.एस.येळीस     लिपीक श्री.मनोज देवरे,प्रा.व्ही.एम.देवरे, प्रा.एस.पी.पाटील , प्रा.एस.व्हीसुर्यवंशी , प्रा.एस.आर.भदाणे      प्रा.एन.बी.वाणी शिक्षकेतर वृंद श्री.सुनील देवरे,श्री.पोपटअहिरे, श्री.रविंद्र ठाकरे,श्री.हेमंत खैरनार आदी उपस्थित होते

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध