Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० जून, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीचे पुन्हा बँकेत निवेदन..!
शिरपूर सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीचे पुन्हा बँकेत निवेदन..!
शिरपूर प्रतिनिधी – शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी संघर्ष समिती, शेतकरी विकास फाउंडेशन यांचे सतत संविधानिक मार्गाने प्रयत्न सुरू आहेत.या प्रयत्नांमुळे तालुक्यात पुन्हा शिरपूर साखर कारखाना बाबत चर्चेला सुरुवात झाली असून याबाबत लोकांमध्ये जागरूकता येऊन पुन्हा एकदा कारखान्याच्या प्रश्न अग्रभागी येत आहे.
आज दिनांक 20 जून रोजी तालुक्यातील शेतकरी संघर्ष समिती व शेतकरी विकास फाउंडेशन यांच्या पदाधिकारी यांनी धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या अध्यक्ष व संचालक यांची भेट घेऊन व निवेदन सादर करून कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्याबाबत विनंती केली आहे.
सदरच्या पत्रामध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करणे बाबत साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेप्रमाणे व मंत्रालयात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांनुसार सदर शिरपूर साखर कारखाना हा केंद्रीय निबंधक दिल्ली यांच्या अखत्यारित येत असला तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सरफेसी कायदा 2002 नुसार साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा अधिकार आहे .त्यानुसार जिल्हा बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी सरफेसी कायद्यातील तरतुदींच्या अवलंब करण्यास हरकत नाही असे सूचना साखर आयुक्त यांनी दिले आहे.
शिवाय सदर बैठकीतला चर्चेतून मंत्री साहेबांनी असेदेखील सूचित केले आहे की जिल्हा बँकेचे व साखर कारखान्याचे संचालक मंडळ सदर सूचना याबाबत सकारात्मक असतील तर कारखाना सुरू करणे कामी शासन सहकार्य करण्यास तयार आहे.
म्हणून शेतकरी संघर्ष समिती शेतकरी विकास फौंडेशन आपणास विनंती करत आहे की आपण जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर त्वरित सुरू करण्याबाबतच्या विषय घेण्यात यावा व सदर कारखाना कार्यालयीन इमारत ,कामगार वसाहत, इत्यादी साठी लागणारी जमीन व मालमत्ता सरफेसी कायद्यानुसार ताब्यात घेऊन सदर कारखाना भाडेतत्त्वावर देणे बाबतची कार्यवाही करणे कामी ठराव संचालक मंडळाच्या सभेत मंजूर करण्यात यावा व साखर कारखाना त्वरित सुरू करण्यासाठी उपाय योजना करून सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आले आहे.
सदर निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर, शेतकरी विकास फाउंडेशन चे अध्यक्ष श्री मोहन साहेबराव पाटील, शेतकरी विकास फाऊंडेशनचे सचिव एडवोकेट गोपालसिंग आर .राजपूत शेतकरी संघर्ष समितीचे श्री कल्पेश सुभाष जमादार,श्री शिरीष पाटील व श्री मिलिंद पाटील यांच्या सह्या आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा