Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० जून, २०२२
Home
/
Unlabelled
/
श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शिरपूर येथे मेंदू व मणक्यांचे विकारांचे तपासणी शिबिर संपन्न..!
श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शिरपूर येथे मेंदू व मणक्यांचे विकारांचे तपासणी शिबिर संपन्न..!
श्री सिद्धेश्वर हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल धुळे आणि डॉक्टर क्लब शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर तालुक्यातील व शहरातील नागरिकांसाठी मेंदू व मणक्यांच्या आजारांविषयी भव्य तपासणी शिबिर पल्स डायग्नोस्टिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल शिरपूर येथे आयजित करण्यात आले.या शिबिरात 345 रुग्णांनी तपासणीसाठी नोंदणी केली. त्यातील 139 रुग्णांना झालेल्या त्रासदायक वेदना विषयक आजारांचे निदान करण्यात आले.यातील 42 रुग्णांची एम आर आय तपासणीसाठी 50 टक्के सवलत मध्ये निवड करण्यात आली तर काही रुग्णांना इतर आवश्यक तपासण्या तसेच मेंदूच्या गाठी व मणक्यांच्या शस्त्रक्रिया धुळे येथील श्री सिद्धेश्वर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये होणार आहेत.आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिरचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले शिरपूर तालुक्यात आजवर शेकडो आरोग्य विषयक शिबीर घेतले असून या शिबिराच्या माध्यमातून अनेक गोरगरीब मजूर शेतमजूर कामगार आदिवासी यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली याचा मनस्वी आनंद वाटतो. परंतु सर्वरोग निदान शिबिर व नेत्र शिबीर घेत असताना यात अनेक रुग्णांना में लहान सहान गाठी, पाठीच्या मणक्यांचे त्रास मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले होते.
याचा विचार करून लोकांना मणक्यांच्या त्रासापासून मुक्त करण्याचा चंग बांधून मुंबई-पुण्यात मिळणाऱ्या सुविधा आपल्या धुळे येथील श्री सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहून या माध्यमातून मेंदू व मणक्यांचे सर्जन डॉक्टर अभिजीत चंदनखेड यांच्या मदतीने गोरगरीब मेंदू आणि त्यांचे मंत्र्यांचे मणक्यांचे त्रास अंगावर काढणाऱ्या रुग्णांपर्यंत उपचार पोहोचवण्याच्या हेतूने आज शिरपूर येथे भव्य मेंदू वर मणक्यांची तपासणी शिबिर घेतले असल्याचे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.डॉ अभिजित चंदनखेड यांनी शिरपूर तालुक्यातील अनेक रुग्णांचे मणक्याचे ऑपरेशन केलेले असून यातील काही रुग्णांनी यावेळी डॉ जितेंद्र ठाकूर आणि डॉ अभिजित चंदनखेड यांचा सत्कार करून आभार मानले.कारण पैशांअभावी आपण उपचार न घेता आता हा त्रास आपल्या मरणा सोबतच जाईल अशी भावना झालेली असताना आणि सर्व मार्ग बंद आलेले असताना डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या रूपाने देवदूत धाऊन येऊन डॉ अभिजित चंदनखेड यांच्या मदतीने सर्व सुरळीत शत्रक्रिया करून नवीन आयुष्य दिल्याबद्दल रुग्णांनी डॉ जितेंद्र ठाकूर आणि डॉ अभिजित चंदनखेड यांचे आभार मानले. यावेळी शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नैनेश देसले,मेंदू व मणक्याचे तज्ञ डॉ.अभिजित चंदनखेड,डॉ.राजकिरण पटेल आणि डॉ जितेंद्र ठाकूर यांनी रुग्णांची तपासणी केली तर सिध्देश्वर हॉस्पिटल स्टाफ यांनी सहकार्य केले.
या शिबिराला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेऊन मदत करणारे डॉक्टर क्लब चे अध्यक्ष डॉ मनोज परदेशी, सेक्रेटरी डॉ.लोकेश वैद्य,आय.एम. ए चे सेक्रेटरी डॉ अमोल जैन यांसह शहर व तालुक्यातील सर्व डॉ पदाधिकारी सहकारी यांनी सहकार्य केल्याबददल सर्वांचे डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी आभार मानले. स्वीयसहाय्यक शाम पाटील,राकेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.या पुढेही जे रुग्ण शिबिरापासून वंचित राहिले त्यांना देखील मदत करणार असल्याचे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा