Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ जून, २०२२

अखेर मोठ्या संकटांना तोंड देऊन आज पांझरा कान चे भाग्य उजळले.आणि त्यावर प्रत्यक्ष आज करार करून कारखान्याच्या मशनरी वर नारळ फोडण्यात आले



आज रोजी दिनांक 21/06/2022 रोजी पांझरा कांन सहकारी साखर भांडणे कारखान्याचे करारनामा करने कामी सब रजिस्टार साक्री यांच्या कार्यालयात यावेळी पार पाडण्यात आला. नंतर करारनामा पूर्ण करून तहसील कार्यालयाचा आवारात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं व काही मान्यवरांच्या उपस्थितीत फटाके व ढोल ताशे वाजून जल्लोष करण्यात आला. व श्री पवन मोरे युवा उद्योजक मे.स्पर्श शुगर इंडस्ट्रीज संचलित पांझरा कान साखर कारखान्याचे डायरेक्टर यांचे जोरदार स्वागत करून विश्राम गृह साक्री येथे मोरे व धनंजय अहिरराव उप सरपंच भांडणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.त्यानंतर पांजरा कान साखर कारखाना भांडणे येथे जाऊन गेटवर नारळ चढवण्यात आले. तसेच मशनरी ची देखील पूजा-अर्चा करण्यात आली. व तदनंतर विश्रामगृह साक्री येथे पत्रकार परिषद घेऊन कारखान्याच्या संबंधित अनेक विषयावर चर्चा व विचार विनिमय करण्यात आला. यावेळी श्री प्रमुख पाहुणे पवन मोरे साहेब यांनी कारखाना हा येणाऱ्या 1 मे 2022 पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊन सन 2023 चा सुरुवाती पर्यंत कारखाना हा कार्यरत होईल अशी ग्वाही श्री पवन मोरे यांनी पत्रकारांना दिली. व तालुक्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. व तालुक्याचा  अर्थव्यवस्थेवर चालना मिळणार असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध