Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ जून, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा येथील कार्यरत तहसिलदार यांनी आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने आपल्या धर्मपत्नी व मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न ; पोलीसांत गुन्हा दाखल
शिंदखेडा येथील कार्यरत तहसिलदार यांनी आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने आपल्या धर्मपत्नी व मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न ; पोलीसांत गुन्हा दाखल
तरुण गर्जना वृत्तसेवा शिरपूर प्रतिनिधी शिंदखेडा : शिंदखेडा येथील कार्यरत तहसिलदार यांनी आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने आपल्या धर्मपत्नी व मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न व पुन्हा माझ्या घरी आल्यास बंदुकीने जीवेठार मारण्याची धमकी दिली.याबाबत सविस्तर वृत्त असे की,शिंदखेडा येथील तहसिलदार सुनिल सौंदाणे यांचे त्यांच्या मुलगी आराध्या यांच्याशी फोनवरुन शाळेचे साहित्य,कपडेलत्ते घेवून देण्याबाबत चर्चा झाल्याने धर्मपत्नी सौ वैशाली सुनिल सौंदाणे व मुलगी आराध्या हे दोघे नाशिकहून शिंदखेडा येथे आले असता आपल्या पतीच्या राहत्या घरी गेले त्यावेळेस घराचा दरवाजा उघडा असल्याने ते सरळ घरात जावून बसले असता तहसिलार सुनिल सौंदाणे यांचे मामा दयाराम बाबुलाल सोनवणे व योगेश पवार (शिक्षक )त्यांची पत्नी निशा योगेश पवार, व मिनल बोडखे हे तिथं उपस्थित होते .
पती घरी नसल्याने ते शांतपणे जावून बसले असतांना दयाराम सोनवणे यांनी
त्यांना हातधरुन घराबाहेर लोटण्याचा प्रयत्न केला तर मिनल बोडखे हे मारण्याच्या उद्देशाने हॉकीस्टिक घेवून आली.त्याच वेळेस सुनिल सौंदाणे हे घरी आले असता त्यांना पाहून जोरजोरात शिवीगाळ करत मिनल बोडखे हीस सांगत आण गं तो रॉड..यांना मी आज मारुनच टाकतो आणि कायमचा विषय संपवतो. असे म्हणत स्टिलच्या रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली.तर मिनल बोडखे हीने हॉकीस्टिकने मारण्यास सुरवात केली. जवळ खुर्ची असल्याने दयाराम सोनवणे, योगेश पवार,निशा पवार यांनी खुर्च्या बाजूला करुन व मुलीचे हात व कपडे ओढून यांना मारझोड करण्यास सहकार्य केले.यात वैशाली सुनिल सौंदाणे यांना हाताचा दंड,पाठ व मानेला जबर जखमा झालेल्या आहेत.तर मुलीला देखील मार लागलेला असल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलेले आहे.
याबाबत शिंदखेडा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यावर प्रथमोपचार करून धुळे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.त्या ठिकाणी नोंद झालेली नव्हती.यावरून तहसिलदार यांचा पोलीसांवर असलेला वचक दिसून येतो...? बऱ्याच उशिरापर्यंत पोलीस तक्रार प्रथम खबर अहवालात पुन्हा माझ्याकडे आल्यास बंदुकीने शुट करुन मारुन टाकेल असे म्हटलेले आहे. खरोखर शासकिय अधिकाऱ्यांना अशी शस्त्रे वैयक्तीक बाळगण्याचे परवाने आहे काय ? असा प्रश्न जनतेसमोर निर्माण होतो.तरी खरोखर यांच्याकडे बंदुक आहे का ? त्याचा परवाना आहे का ? याचा तपास पोलीसांमार्फत दिलेल्या फिर्यादीनुसार होणे आवश्यक आहे.
तसेच ते राजपत्रित दंडाधिकारी या पदावर असल्याने पोलीसांच्या खाकीत सौम्यता येते की,काय ? असा प्रश्न निर्माण जनतेकडून दबक्या आवाजात विचारला जात आहे.राव असो की,रंक कायदा सर्वांसाठी एकच त्याचा प्रत्यय जनतेसमोर सादर करण्यासाठी पोलीसांनी आपल्या संपूर्ण अधिकाराचा वापर करुन असाहय महिलेस व तिच्या मुलीस न्याय देणार का ? असा खडा सवाल जनतेच्या वतीने विचारत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
काय झाले धुळे जिल्ह्यात भ्रष्टाचार च कलस राजकीय नेते आणि गुंड यांचे हात एक झाले आणि अराजकता माजली जिल्ह्यात
उत्तर द्याहटवा