Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० जून, २०२२

साक्री तालुक्यातील भांडणे गावाची विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ची निवडणूक सर्वपक्षीयांचा वतीने बिनविरोध करण्यात यश



साक्री तालुक्यातील मौजे भाडणे तालुका साक्री जिल्हा धुळे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी भाडणे यांची सार्वत्रिक निवडणूक मोठ्या उत्साहात बिनविरोध करण्यात आली. साक्री तालुक्यातील भांडणे गावा चा राजकीय दृष्ट्या सजग आणि पुरोगामित्वाचा अवलंब करणारे गाव म्हणून संपूर्ण तालुक्यात एक वेगळी ओळख आहे.अशा गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ची निवडणूक सर्वपक्षीय मिळून विचा0र विनिमय करून अखेर सर्वांना विश्वासात घेत,सर्वानुमते बिनविरोध पार पाडण्यात आली. यावेळी गावातील सर्वानुमते सौ भावना अनिल सोनवणे यांची चेअरमन पदासाठी निवड करण्यात आली. तसेच व्हाईस चेअरमन म्हणून सौ. किरण अरुण देसले यांची निवड करण्यात आली. त्यानंतर श्री शिरीष सोनवणे, वसंत सोनवणे, प्रल्हाद देसले, दिलीप सोनवणे, किशोर सोनवणे, विजय सोनवणे, प्रदीप सोनवणे, वसंत सोनवणे, लक्ष्मण सूर्यवंशी, जीवन काळे, अशा सर्व सदस्यांची संचालक पदी बिनविरोध नेमणूक करण्यात आली. या सर्व प्रक्रियेत महत्वाची भूमिका मांडणारे व हे सर्व घडवून आणणारे भांडणे गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुणांचे सहकार्य लाभले. ते खालील प्रमाणे श्री चंद्रकांत सोनवणे,भास्कर देसले,विजय ठाकरे,सुरेश सोनवणे,शांताराम देसले,वेडू अण्णा सोनवणे, प्रसाद देसले,शरद सोनवणे, अरुण महाजन,श्रीपाद देसले, शामकांत सोनवणे,अनिल सोनवणे,अरुण बाबा देसले रवींद्र सोनवणे अविनाश सोनवणे,प्रवीण देसले,खंडेराव सोनवणे,योगेश सोनवणे,संतोष सोनवणे,भरत देसले,महेंद्र देसले,आदींचे सहकार्य लाभले. या सर्व प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. एल.साळुंके.यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भांडणे गावचे उपसरपंच श्री धनंजय अहिरराव यांनी केले.यावेळी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी नवनिर्वाचित सर्वच पदाधिकाऱ्यांनाचे अभिनंदन केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध