Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ जून, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुका प्रहार चा वतीने निराधार महिला वैशाली देसले याना साक्री तालुका नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांचा कडून चेक वितरित करताना
साक्री तालुका प्रहार चा वतीने निराधार महिला वैशाली देसले याना साक्री तालुका नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांचा कडून चेक वितरित करताना
प्रहारच्या पाठपुराव्याने निराधार वैशाली समाधान (रोहिदास) देसले यांना 20,000 मदत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते. राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या प्रेरनेने साक्री तालुक्यातील अशा अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका विभाग प्रमुख जयेश बावा आणि संजय पाटील यांच्या माध्यमातून होत आहे नुकताच कोरोनाच्या काळात दुर्धर आजाराने समाधान देसले या तरुण मुलाचा मृत्यू झाला असतांना निराधार वैशाली रोहिदास (समाधान) देसले यांच्या कुटुंबावर संकट ओढावून उदरनिर्वाह चा प्रश्न निर्माण झाला होता कै समाधान देसले यांच्या वर्ग मित्रांनी देखील 15500 रुपयांची मदत वैशाली देसले यांना केली होती अशा दातृत्व करणाऱ्या मित्रांचे सर्वत्र कौतुक झाले अशावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका विभाग प्रमुख जयेश बावा, दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या पाठपुराव्याने व नायब तहसीलदार गोपाल पाटील,मंडळ अधिकारी शिंदे साहेब व तलाठी निलेश पाटील साहेब तसेच संजय गांधी निराधारचे सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने वैशाली रोहिदास देसले यांना मदत झाली असून वैशाली देसले यांनी सगळ्यांचे आभार मानले या वेळी प्रहार चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा