Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २२ जून, २०२२

अन्नधान्याच्या लाभापासून वंचित रेशनकार्डधारकांना लाभ द्या..!



शेगाव (प्रतिनिधी)अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित रेशनकार्डधारकांना तात्काळ अन्नपुरवठा करा अशी मागणी भोई समाज पेरिटेबल ट्रस्टकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मागील अनेक दिवसांपासून गा तहसील कार्यालयातून देण्यात आलेल्या असंख्य रेशनकार्डधारकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत नाही तहसील कार्यालयाकडे तक्रार केली असता शासनाकडे सदहू रेशनकार्डधारकांच्या नावे अन्नपुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यानुसार अन्नधान्याचा कोटा प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना लाभ देण्यात येईल असे कळविण्यात आले आहे तरी पंचितांना अभधान्याचा लाभ देण्यात यावा. अन्यथा लोकशाही मार्गनि तहसील कार्यालयासमोर परिवारासह आमरण उपोषण करण्यात येईल.

भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे निवेदन

असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश राजगुरे बाबुराव धुळे, सौ. उपाबाई वासुदेव शेगोकार,दिपक भीमराव शेगोकार,दिलीप भीमराव शेगोकार,ग.मा. वेदना बोरसे,सौ.सविता किशोर दामोदर,
प्रकाश हरिचंद्र डांगे,विनोद कुकडे,अमोल सुकदेव राजगुरे,किशोर सुकदेव राजगुरे, सौ. शोभा अनिल बोरसे,अशोक समाधान खंडेराव,सतिश शामराव नंदाने,अविनाश नंदाने यांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध