Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ जून, २०२२

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान




शेगांव : कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. ७०० भाविक ५ जिल्हे,७५०किमी अंतर पार करत आषाढीला पंढरपुरात पोहचणार गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान; ७०० भाविक ५ जिल्हे,७५० किमी अंतर पार करत आषाढीला पंढरपुरात पोहचणार तब्बल दोन वर्षानंतर यंदा आषाढी यात्रा निर्बंधमुक्त साजरी होणार आहे. यंदा आषाढीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत.आज सकाळी ७ वाजता शेगावहून संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं. त्यानंतर,दुपारी नागझरी येथे आगमन आणि पारस येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. शेगावच्या या दिंडीचं हे ५३ वर्ष.७०० भाविकांसह सकाळी शेगाव येथील मंदिरातून ही दिंडी पायी ७५० किमी जाणार असून पाच जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहचणार आहे.  

कोरोना, लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर आज संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरसाठी शेगाव येथून निघाली आहे. या दिंडी सोहळ्यात ७०० वारकरी सामील झाले आहेत.ही दिंडी पाच जिल्ह्यातून जाणार असून तब्बल ७५० किमी अंतर पार करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचणार आहे. वारकऱ्यांचे पांढरे शुभ्र कपडे, अत्यंत शिस्तीत चालणारी पावलं अशी या दिंडीची ओळख आहे. 

यावर्षी संत गजानन महाराजांच्या दिंडीचं हे ५३ वर्ष आहे. गेल्यावर्षी  शेगाव संस्थानचे कार्यकारी विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव निळकंठ दादा पाटील यांनी विधिवत पूजा आरती करून पालखीला प्रस्थानासाठी शुभेच्छा दिल्या आहे. मोठ्या दिमाखात गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे. 

असा असेल गजानन महाराजांच्या पालखीचा मार्ग..

गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ६ जूनला (सोमवारी) झालं आहे. पालखीचं सकाळी ७ वाजता मंदिरातून प्रस्थान होणार आहे.त्यानंतर पालखीचा मार्ग दुपारी नागझरी येथे असणार आहे. तर रात्री पालखीचा मुक्काम पारस येथे असणार आहे.दुसऱ्या दिवशी म्हणजेच, ७ जूनला दुपारी गायगांव येथे पालखी प्रस्थान करणार आहे. तर रात्री भौरद येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. 

कोरोनामुळे गेली दोन वर्ष वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. त्यांच्या पायी वारीत खंड पडला.मात्र, परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला.दोन वर्षांचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत.गावागावांत वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता सर्व वारकऱ्यांना पालखी प्रस्थानाची आणि पायी विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागलेली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध