Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० जून, २०२२

शिरपुरात २३ सावकारांविरोधात अवैध सावकारी व खंडणी वसूलीसह,दरोड्याचा गुन्हा दाखल.



शिरपूर (प्रतिनिधी):- आजीच्या कर्करोगावरील उपचारासाठी  घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात भरमसाट व्याज आणि मुद्दल वसूल केल्यानंतरही घरातील वस्तू उचलून घेऊन जाणाऱ्या २३ अवैध सावकारांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . उल्लेखनीय आहे कि,पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी अवैध सावकारांविरोधात मोहीम उघडली आहे  असे असतांनाच शिरपुरात तब्बल २३ जणांविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. संशयितांमध्ये शिरपूरातील २२ तर पुणे येथील एकाचा समावेश आहे. 

याबाबत शिरपुर येथील कुणाल जुलवाणी ने लेखी फिर्याद दिली.त्याच्या आजीला कर्करोग असल्यामुळे तिच्या उपचारासाठी त्याच्या वडिलांनी बँकेचे कर्ज काढले होते. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे ते भरण्यासाठी त्यांना व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारांची माहिती मिळाली.२०२० मध्ये त्याने संशयितांकडून वेळोवेळी पैसे घेतले. एकूण ३४ लाख पाच हजार रुपये घेतल्यानंतर त्याची परतफेड ऑनलाइन व रोखीने करुन संशयितांना तब्बल ४९ लाख ४३ हजार रुपये परत केले.मात्र त्यानंतरही थकबाकी असल्याचे दाखवून संशयित कुणालच्या घरातून लॅपटॉप स्पीकर,मोठे लाऊडस्पीकर,मोबाईल ॲक्सेसरिज असे साहित्य उचलून घेऊन गेले.थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्याकडून स्टँप पेपरवर लिहून घेणे,सह्या केलेले कोरे धनादेश घेणे,हातपाय तोडून जीवे ठार मारण्याची धमकी ही दिली.असे अनेक प्रकारही त्यांनी केले.कुणाल हरीलाल जुलवाणी(वय 27) याने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादित त्याचे वडील नपा शाळेत शिक्षक असून,त्यांच्या शाळेवर जाऊन धमकी दिली.त्याचे काका पत्रकार गोपाल मारवाडी यांच्या दुकानावर जाऊन धुमाकूळ घातला.२३ जणांवर गुन्हा संशयित आरोपींनी कुणाल जुलवाणी यांच्या घरात घुसून त्यांच्याकडून व कुटुंबियांकडून जबरदस्तीने विविध बँकांचे सह्या केलेले धनादेश,१० हजारांचा लाऊड स्पीकर,४० हजारांचा लॅपटॉप,१२०० रुपयांचा पॉवर बँक असा मुद्देमाल तसेच घर व दुकानातील सामानदेखील घेऊन गेले.वेळोवेळी अश्लील शिवीगाळ करून हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली.यासोबतच मोठ्या प्रमाणावर सुमारे भरमसाठ अवाजवी व्याजाची वसुली करूनदेखील अतिरिक्त पैशांची मागणी करत असल्याने त्रस्त होऊन अखेर जुलवाणी यांनी कंटाळून शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

हे आहेत संशयित सावकार- संशयितांमध्ये मनोज गुलाबराव पाटील,उमेश संतोष पाटील,विवेक शिरीष पाटील,निश्चय योगेंद्र ललवाणी,
जगदीश राजेंद्रसिंह गिरासे, किरण पांडुरंग मराठे,शशीपाल चंद्रसिंह जमादार,रुद्रसिंह सुभाषसिंह राजपूत, सागर वसंत माळी,चेतन रवींद्र पाटोळे, कृष्णा कुबेर पारधी,रवींद्र हिरामण खजुरे,राहुल नारायण झांजरे,भूषण गोपाल पाटील,चेतन सुभाष माळी,
अमोल गोपाल सोनवणे,अविनाश राजू बैसाणे,संजय पाटील ,महेश कोळी , रोहित भोई, सागर मधुकर मराठे ,सागर भाटपुरे ( सर्व रा . शिरपूर ) व रोहन राजू राऊत ( रा.पुणे ) यांचा समावेश आहे.

अशा २३ संशयित आरोपीविरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ , ४५ सह ३९२ , ४५२ , ३८४ , ५०४ , ५०६ , ५०७ , ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किरण बा-हे तपास करत आहे.              

सावकारी व्यवसायावर नियंत्रण आवश्यक शिरपूर शहरासह तालुक्यात सावकारीचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे .    

उल्लेखनीय आहे कि,संपूर्ण जिल्ह्यात सावकारी करण्याचा सहकार उपनिबंधक कार्यालयातून वैध परवाना घेऊन सावकारी व्यवसाय करणारे 14 व्यक्ती आहेत.परंतु शिरपूर शहर व तालुक्यात सध्या एकही व्यक्ती नोंदणीकृत सावकारी परवाना धारक नाही.जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालयातून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मागच्या वर्षी 1एप्रिल 2021 ते 31मार्च 2022 पर्यंत शिरपूर तालुक्यात नोंदणीकृत फक्त 2 परवाना धारक होते.त्यांच्यापैकी दोघांनी ही यंदा लायसन्स रिन्युअल केलेले नाही.आणि शासकीय नियम असा आहे कि,सावकारी व्यवसाय करण्याचा लायसन्स जरी कोणी घेतला असेल तरीही 1रु.प्रति शेकडा प्रति महिना म्हणजे 12% वार्षिक ते 1.5 प्रति शेकडा प्रति महिना याच हिशोबाने फक्त 18% वार्षिक व्याजाची तो आकारणी करू शकतो. खाजगी वैध परवाना धारक शेतीवर आधारित कर्ज म्हणजे शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त 1 रु.प्रति शेकडा प्रति महिना म्हणजे 12 % वार्षिक व्याज दराने तो घेऊ शकतो.परंतु शिरपुर तालुक्यात व शहरांत सध्या एकही वैध परवाना धारक सावकार अस्तित्वात नाही.ही बाब महत्त्वाची आहे.तसेच जास्तीत जास्त गरजूंनी या सावकारांकडून किरकोळ रक्कम घेतलेली असताना सुद्धा अवास्तव व्याज देणे शक्य नसल्याने,हे सावकार घरातून मौल्यवान वस्तू ,दुचाकी गाडी,कार,शेती,प्लॉट,दुकान,जमिनी नावावर करून घेत आहे . 

विशेषतः

यात राजकीय गांवपुढाऱ्यांचादेखील समावेश आहे.सावकारांनी या अवैध व्यवसायातून भरपूर प्रमाणात पैसा कमवलेला आहे,ही बाब सर्वश्रुत असल्याने यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.लवकरच संपूर्ण तालुक्यात व शहरांत हैदोस घातलेल्या सर्वसामान्य व अडल्या नडलेल्यांचे बोकांडी बसणा-या दोन नंबरची कमाईवर सावकारी करणारे व त्यांनी पाळलेल्या गावगुंडांविरुध्द जिल्हा पोलिसदल व तालुका पोलिस दल काय कठोर कार्रवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध