Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० जून, २०२२
Home
/
Unlabelled
/
सन.२० जून २०२२ चा विधान परिषदेचा निवडणुकीत आज बळी कोणाचा जाणार ? पाडवी,खडसे की भाई
सन.२० जून २०२२ चा विधान परिषदेचा निवडणुकीत आज बळी कोणाचा जाणार ? पाडवी,खडसे की भाई
महाराष्ट्राची विधानपरीषदची निवडणूक आता अंतीम टप्प्यात आली आहे. निवडणुकीला आता खरया अर्थाने रंगत आली आहे भाजप आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या आमदारांना सुरक्षीत अशा हाटेलात मुक्कामी ठेवण्यात आले आहे कुठेही दगा फटका होऊ नये या साठी या वेळी महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षातील नेत्यांनी आपापल्या आमदारांवर कडक लक्ष ठेवले आहे.
एका अर्थी नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे मागील राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील दहा आमदार भाजप ने फोडून आपला तिसरा उमेदवार निवडून आणला होता या वेळी ही आम्ही आमचा पाचवा उमेदवार निवडून आणू असे भाजपने जाहीर पणे सांगितल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या वेळी अधिक काळजी घेतली जात आहे इतके असूनही भाजप आम्ही आमचा पाचवा उमेदवार निवडून आणू या वर आजही ठाम आहे या वेळी निवडणूक ही गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेते अस्वस्थ झाले आहेत विधानसभेची आमदारांची एकुण संख्या आहे २८८ त्या पैकी एका आमदाराचे निधन झाले आहे आणि दोन आमदार कैदेत असल्याने त्यांना मतदान करता येणार नाही त्या मुळे आमदारांची एकूण संख्या २८५झाली आहे या संख्ये प्रमाणे उमेदवाराला विजयी होण्यासाठी २६मतांची गरज आहे शिवसेनेचे एकुण आमदारांची संख्या आहे ५६ पण त्यात एका आमदाराचे निधन झाले आहे त्यांची आमदारांची संख्या ५५आहे
शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणूकीला उभे आहेत हे दोन्ही उमेदवार त्यांच्या आमदारांची संख्या ५५असलयाने सहज निवडून येऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३आमदार आहेत त्यांचे दोन आमदार कैदेत असल्याने ते मतदान करू शकत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ला त्यांचे दोन उमेदवार निवडून येण्यासाठी एका मताची आवश्यकता आहे काँग्रेस चे ४४आमदार आहेत काँग्रेस ला आपले दोन उमेदवार निवडून येण्यासाठी आठ मतांची गरज आहे भाजप ने आपल्या पाचव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काही आमदार फोडावे लागतील या साठी भाजपाने शिवसेनेचे आमश्या पाडवी आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे एकनाथ खडसे यांना लक्ष केले आहे एकनाथ खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेस ने राज्यपाल नियुक्त यादीत नाव दिले असले तरी ती यादी राज्यपालांनी रोखून धरल्याने खडसे आमदार होऊ शकले नाही आता राष्ट्रवादी काँग्रेस ने विधानपरीषद च्या निवडणुकीत खडसेंना उमेदवारी दिली आहे.
भाजप आता खडसे निवडणून येऊ नयेत या साठी कसोशीने प्रयत्न करेल यात शंका च नाही कारण खडसेंना पराभूत करून आपल्या पक्षातून बंडखोरी करणयारयाला धडा शिकवला जातो असा संदेश जाईल हा संदेश खरा तर पंकजाताई मुंढे साठी असेल कारण विधानपरीषदेत भाजप ने पंकजा मुंडे ना उमेदवारी न दिल्याने पंकजा मुंडे नाराज आहेत सध्या पंकजा मुंडे यांची भूमिका तळ्यात मळ्यात असल्याने त्यांना संदेश देणे गरजेचेच आहे
या मागे अनेक कारणे ही आहेत त्या साठीच भाजपने खडसेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे अशी चर्चा सुरू आहे तसे पाहिले तर काँग्रेस चे उमेदवार भाई जगताप यांचा भाजप सहज पराभव करु शकतात भाईंच्या पराभवाचे मात्र शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात बेबनाव निर्माण होऊ शकतो. हा सुध्दा डाव भाजप चा आहे मात्र भाजपला भाईंपेक्षा खडसेंचा पराभवाने अधिकचा फायदा होणार आहे.भाजपला आमश्या पाडवी चा पराभव करून शिवसेनेलाही धक्का द्यायचा आहे
पण या पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस याचे उमेदवार काठावरचे असल्याने भाजप ला हे उमेदवार पराभूत करणे सहज शक्य आहे ही सगळी गणिते विधानपरीषद निवडणूक गुप्त मतदानाने होणार असल्याने भाजप आपल्या डावपेचांने यशस्वी होऊ शकतो.या मुळेच महाविकास आघाडीतील आमदारांना सांभाळणे नेत्यांना मोठ्या जिकीरीचे झाले आहे
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी संख्या बळावर बहूमत सिध्द केले असले तरी राज्य सभेचा आपला उमेदवार निवडून आणू शकले नाही ही नामुष्की ते टाळू शकले नाही आता विधानपरीषद निवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी तीनही पक्षातील नेत्यांनी कंबर कसली असली तरी आपला उमेदवार निवडून आणू शकु हा आत्मविश्वास गमावून बसल्याची त्यांची अवस्था आहे गुप्त मतदान हे भाजप ने आपल्या विजयाची,तर महाविकास आघाडीची एकसंघ एकजूट ची लढाई! यात कोण बाजी मारेल हे आज होत असलेल्या मतदानावरुन ठरेल
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा